PMOS Symptoms: महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ज्या आजाराला आपण वर्षानुवर्षे 'PCOS' म्हणून ओळखत होतो, त्याला आता 'PMOS' (पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हरियन सिंड्रोम) म्हटले जाते. 75 टक्के महिला या समस्येचा सामना करतात, पण त्यांना याबाबत माहितीच नाही. केवळ मासिक पाळी अनियमित असणे म्हणजेच हा आजार नव्हे, तर शरीरातील 'इन्सुलिन रेझिस्टन्स' हे याचे मुख्य कारण आहे. मासिक पाळी नियमित असली तरीही हा त्रास असू शकतो. या आजाराची लक्षणे, त्यामागील नेमके कारण आणि जीवनशैलीत करायचे महत्त्वाचे बदल याबाबत डॉ रुचा पै यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
डॉ. रुचा पै यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, PCOS ला आता PMOS म्हणतात आणि 75 % महिलांना हा त्रास आहे, त्यांना अजूनही माहीतच नाही. फक्त पाळी अनियमित आहे म्हणून पीसीओएस (PCOS) होत नाही... खरं कारण अनेक वेळा शरीरातील Insulin Resistance असतं. आज लाखो महिलांमध्ये लक्षणे दिसतात, पण निदान होत नाही.
मासिक पाळी नियमित असली तरी PMOS असू शकतं
दुर्लक्ष केली जाणारी लक्षणे
- अचानक वजन वाढणं
- मुरुमं
- केस गळणं
- चेहऱ्यावर केस वाढणं
- सतत थकवा
- वंध्यत्व (Infertility)
- हार्मोनचे संतुलन बिघडणे (Ultrasound normal असला तरी hormonal imbalance असू शकतो)
PMOS म्हणजे काय?
- P म्हणजे पॉलीएंडोक्राइन(Polyendocrine) : अनेक हार्मोन्स एकत्रित असंतुलित होणे
- M म्हणजे मेटाबॉलिक (मेटाबॉलिज्म+ इन्सुलिन रेझिस्टन्स मुख्य कारण)
- 0 म्हणजे ओव्हरियन: ओव्हरीजवर परिणाम दिसतो
- S म्हणजे सिंड्रोम अनेक लक्षणांचा समूह
- फक्त ओव्हरीजचा नाही तर पूर्ण मेटाबॉलिज्मचा प्रश्न निर्माण होतो.
PMOS सुधारू शकतं सुरुवात lifestyle पासून करावी.
- प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट: दही, मूग, पनीर, अंडी पण Poha/bread टाळा
- जेवणानंतर 10 मिनिटे चाला, यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते
- कमी झोपल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स (insulin resistance) वाढू शकते
- रात्री 8 वाजेपूर्वी जेवण करा: उशीरा जेवण केल्यास हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो
- रोज stress manage करा: मेडिटेशन आणि प्राणायमामुळे मदत मिळू शकते
आहार नियम जे insulin resistance कमी करण्यात मदत करतात
- जेवणात प्रोटीन + फायबरचा समावेश करावा, यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण वाढत नाही, पोट भरलेले राहते.
- रिकाम्या पोटी गोड खाऊ नका, अचानक रक्तशर्करा वाढते, गोड पदार्थ जेवणानंतर खा
- भिजवलेली मेथी, दालचिनी, हळद + मिरी रोज खा.
- वारंवार काही-न्-काही (snacking) बंद करा, जेवणात 4-5 तासांचं अंतर ठेवा
PMOS साठी या गोष्टीही करू शकता
1. आठवड्यातून तीन वेळा Strength Training घ्या
मसल्स वाढले की रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यासाठी स्क्वॅट्स, lunges,पुशअप्स यासारख्या व्यायाम प्रकारांसह योग करू शकता.
2. कार्डिओ + Strength कॉम्बो
तीन दिवस strength + दोन दिवस चालणे / योग
3. स्ट्रेबस कंट्रोल
रोज 10 मिनिटे प्राणायम, कॉर्टिसोल + इन्सुलिन कमी होण्यास मदत
(नक्की वाचा: Burning Sensation In Feet: पायांची जळजळ आणि सूज येण्याकडे करू नका दुर्लक्ष, असू शकतो या गंभीर आजाराचा संकेत)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world