जाहिरात
This Article is From Mar 11, 2024

अतिरिक्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन धोकादायक? कोणत्या आजारांना द्याल निमंत्रण, जाणून घ्या!

Are you getting too much protein?: जास्त कॅलरीज असलेली प्रथिनं, सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ आदी गोष्टींमुळे वजन वाढू शकतं.

अतिरिक्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन धोकादायक? कोणत्या आजारांना द्याल निमंत्रण, जाणून घ्या!
मुंबई:

Excess of Protein Causes Which Disease: प्रथिनं म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून अमीनो अॅसिडचे बनलेले मोठे रेणू आहेत. प्रथिनं शरीराच्या ऊती आणि अवयवांच्या रचना, कार्य आणि नियमनासाठी आवश्यक आहेत. ते अनेक शारीरिक क्रियांमध्ये मोठी भूमिका बजावतात.  साधारणपणे, पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. मात्र जास्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. 

अतिरिक्त प्रथिनांच्या सेवनाने होणारं नुकसान | Disadvantages of Consuming Too Much Protein

1. किडनी खराब होण्याचा धोका

अतिरिक्त प्रमाणात प्रथिनांच्या सेवनाने किडनीवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे ग्लोमेरुलरचा दबाव वाढल्याने किडनीचं नुकसान होऊ शकतं. यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्हाला किडनीची समस्या असेल तर आपल्या आहारातील प्रथिनांच्या सेवनात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर ठरू शकेल.  

2. पचना संबंधित समस्या

अतिरिक्त प्रमाणात प्रथिनांच्या सेवनाने बद्धकोष्ठता, सूज आणि अपचनासह पचनासंबंधित त्रास उद्भवू शकतात. यासाठी आहारात पुरेसं फायबर, भरपूर पाणी आणि एक संतुलित आहाराचा समावेश असावा.   

3. पोषक तत्वांचं असंतुलन

अतिरिक्त प्रथिनांच्या सेवनाने पोषण तत्वांमध्ये असंतुलन होऊ शकतं. कारण ते इतर आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट्स कमी करू शकते. त्यामुळे आपल्या  आहारात फायबर, कॅल्शिअम, कर्बोदके आदी अन्नपदार्थ असलेला संतुलित आहार असावा. 

4. डिहायड्रेशन

अतिरिक्त प्रथिनांच्या सेवनाने शरीराची पाण्याची आवश्यकता वाढू शकते. जर द्रव्य पदार्थांचं सेवन पुरेसं नसेल तर डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या मागणीनुसार, पाणी प्यावं. 

Latest and Breaking News on NDTV

5. हाडांसंबंधित समस्या

प्रथिनांच्या अतिरिक्त सेवनाने कॅल्शिअम उत्सर्जन वाढू शकतं. अशा प्रकारच्या सततच्या जीवनशैलीमुळे हाडांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आहारात पुरेशा कॅल्शिअमचा समावेश करा आणि आहारात संतुलन राखा.  

6. हृदयविकाराचा धोका

काही उच्च प्रथिनांचा आहार, विशेषत: मांसयुक्त आहारामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. कमी फॅट असलेले प्रथिनांचे स्त्रोत निवडा. तुमच्या आहारात संतुलित पदार्थांचा समावेश असेल तर हृदय निरोगी राखण्यास मदत होईल. 

7. वजन वाढणे

जास्त कॅलरीज असलेली प्रथिनं, सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ आदी गोष्टींमुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे आहारात प्रथिनांचा समावेश करताना कॅलरीजकडे लक्ष द्या. अन्यथा वजन वाढू शकतं. त्यामुळे अन्नपदार्थांच्या प्रमाणासह कॅलरीजकडे लक्ष द्या आणि कमी फॅट्स असलेल्या प्रथिनांचं सेवन करा. 

8. लिवर संबंधित समस्या

जास्त प्रथिनांच्या सेवनामुळे लिवरवर दबाव येऊ शकतो. विशेषत: जर आधीच लिवरसंबंधित आजार असेल तर त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला लिवरसंबंधित आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.  

Home Remedies and Foods To Cure Constipation | बद्धकोष्ठतेपासून सुटका...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: