What is IV Bar: लग्नात 'आयव्ही बार'चा ट्रेंड! पाहुणे मंडळी थेट ड्रिप लावून घेतात; नेमका प्रकार काय?

दिल्लीतील राजौरी गार्डन येथील 'स्कल्प्टेड बाय कियान' नावाच्या एका स्किन आणि हेअर क्लिनिकने त्यांच्या आय. व्ही. बार सेटअपचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. जो तुफान व्हायरल झाला आहे. केवळ 3 दिवसांत या व्हिडिओला 7.7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

 What is IV Bar: इंटरनेटवर दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ, फॅशन किंवा ब्युटी हॅक्स लोक लगेच नकल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्या लक्झरी लग्न समारंभात एक असा ट्रेंड आला आहे, जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत आणि काही जणांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा नवीन ट्रेंड म्हणजे लग्नसमारंभाच्या ठिकाणी उघडलेला 'आय. व्ही. बार' (IV Bar) आहे. लग्नामध्य हँगओव्हर आणि थकवा यावर एक स्टायलिश उपाय म्हणून आय व्ही बार ही संकल्पना समोर आली आहे.

नेमका काय आहे आय. व्ही. बार?

दिल्लीतील राजौरी गार्डन येथील 'स्कल्प्टेड बाय कियान' नावाच्या एका स्किन आणि हेअर क्लिनिकने त्यांच्या आय. व्ही. बार सेटअपचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. जो तुफान व्हायरल झाला आहे. केवळ 3 दिवसांत या व्हिडिओला 7.7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये पाहुणे आय. व्ही. बारमध्ये वाट पाहत रांगेत उभे असल्याचे दिसते. महागडे कपडे घातलेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्या नसांना ड्रिप लावून बसलेले आहेत. डॉक्टर्स मास्क घालून त्यांच्या विनंतीनुसार त्यांना मदत करताना दिसत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

आय व्ही ड्रिप काय करते?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, 'स्कल्प्टेड बाय कियान'च्या टीमने स्पष्टीकरण दिले की, हँगओव्हरची लक्षणे कमी करण्यासाठी हे आय. व्ही. ड्रिप वापरले जातात.  टीमने स्पष्ट केले की, दारूमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. तसेच रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे डोकेदुखी, मळमळ आणि थकवा जाणवतो. त्यांचे आय. व्ही. ड्रिप फक्त लोकांना इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन सी देऊन पुन्हा हायड्रेटेड करतात. ज्या पाहुण्यांनी गेल्या 8 तासांत दारू घेतली नाही, त्यांना ग्लुटाथिओन देखील ऑफर केल्याचा दावा त्यांनी केला. हा ट्रेंड दुबई, लॉस एंजेलिस आणि इतर 'पार्टी शहरांमध्ये' सामान्य असला, तरी भारतीयांनी त्याला 'ग्लॅमरस' रूप दिले आहे, असे टीमने नमूद केले.

Advertisement

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

या ट्रेंडवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने लिहिले की,"या विक्रेत्याला तुरुंगात टाकता येईल. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. याला वैद्यकीय संस्थेने मान्यता दिली आहे का?" दुसऱ्या एका युझरने सल्ला दिला की, "कितीही उदात्तीकरण केले तरी हे कूल दिसत नाही."

Topics mentioned in this article