Jamun in English: उन्हाळ्यात मिळणारे जांभूळ फळ आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याचे नाव ऐकून लोक संभ्रमात पडतात. जांभळाला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? अनेक लोक हे फळ 'ब्लॅकबेरी' असल्याचे समजतात, पण सत्य काही वेगळेच आहे. चला जाणून घेऊया फळाचे योग्य इंग्रजी भाषेतील नाव आणि याचे जबरदस्त फायदे. तज्ज्ञांच्या मते जांभळामध्ये ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे रक्तशर्करेचे (ब्लड शुगर) प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
जांभळाला इंग्रजीत काय म्हणतात?
जांभूळ हे भारतातील उन्हाळ्याच्या हंगामात उपलब्ध होणारे एक लोकप्रिय फळ आहे. जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मधुमेहाच्या (शुगर) रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते. यामध्ये 'जंबोलिन' नावाचं एक घटक असतं, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय जांभूळ पचनक्रियेसाठीही उत्तम मानले जाते. तसेच हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेवर तेजही येते.
जांभळाला इंग्रजीत काय म्हणतात? (What is Jamun called in English?)
जांभळाला इंग्रजीत 'Java plum' किंवा 'Black plum' म्हटले जाते. याचे वैज्ञानिक नाव 'Syzygium cumini' असे आहे. बहुतांश लोक याला 'Indian blackberry' म्हणत असले, तरी हे युरोप किंवा अमेरिकेत आढळणाऱ्या खऱ्या 'blackberries' पेक्षा जैविकदृष्ट्या वेगळे आहे. हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे, जे आपल्या गडद जांभळ्या रंगासाठी आणि औषधी गुणांसाठी ओळखले जाते.
(नक्की वाचा : Acid Reflux Remedies: पोटातील जळजळ किंवा गॅसमुळे त्रासले आहात? किचनमधील या 5 गोष्टींमुळे तातडीने मिळेल आराम)
जांभळाचे इंग्रजीतील अचूक नाव काय आहे?| Jamun Name in Englishजांभळाचे सर्वात अचूक इंग्रजी नाव 'Java plum' हे आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 'Black plum' या नावाचाही वापर केला जातो. काही बोटेनिकल नोंदींमध्ये याला 'Malabar plum' म्हणूनही सूचीबद्ध केले गेले आहे.

Photo Credit: jamun
वेगवेगळ्या भाषांमध्ये जांभळाची वेगवेगळी नावे
जांभूळ किंवा जावा प्लमला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते:
- हिंदी भाषेमध्ये याला जामुन / जामन म्हणतात.
- संस्कृत भाषेमध्ये जंबू / राजजंबू म्हणतात.
- बंगाली भाषेमध्ये काला जाम / जाम म्हणतात.
- पंजाबी भाषेमध्ये जामुन / जमालू म्हणतात.
- मराठी भाषेमध्ये जांभूळ म्हणतात.
- तेलुगू भाषेमध्ये नेरेडु / अल्ला नेरेडु म्हणतात.
- तमिळ भाषेमध्ये नवल पझम म्हणतात.
- मल्याळम भाषेमध्ये नजवल / नजवल पझम म्हणतात.
- कन्नड भाषेमध्ये नेराले हन्नू म्हणतात.
- गुजराती भाषेमध्ये जंबू / काला जंबू म्हणतात.
- ओडिया भाषेमध्ये जामू कोली म्हणतात.
- आसामीमध्ये जामू / काला जामू म्हणतात.
Jamun vs Blackberry: दोन्ही एकच फळ आहेत का?
जरी जांभळाला 'इंडियन ब्लॅकबेरी' म्हटले जात असले, तरी ते प्रत्यक्षात ब्लॅकबेरी नाही. जांभूळ आणि ब्लॅकबेरीचा आपापसात काहीही संबंध नाही. ब्लॅकबेरी ही काटेरी झुडपांवर आणि थंड हवामानात उगवते. दुसरीकडे जांभूळ हे उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठ्या सदाहरित झाडांवर उगवते.
जांभूळ खाण्याचे 5 मोठे फायदे Jamun Benefits
- जांभूळ हे अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस आहे. याचा गडद जांभळा रंग हा 'अँथोसायनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे (पिगमेंट) असतो.
- जांभळामध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते आणि त्याचे ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असते. फळाच्या बीमध्ये 'जंबोलिन' नावाचे संयुग (कम्पाउंड) असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते.
- जांभूळ उन्हाळ्यात अतिशय कमी वेळेसाठी उपलब्ध असते, साधारणपणे हे फळ मे महिना ते जुलै महिनादरम्यान मिळते.
- जांभळाची झाडे निसर्गतः खूप मजबूत असतात, म्हणजेच ती पाणी साचलेल्या, क्षारयुक्त किंवा दुष्काळग्रस्त जमिनीतही उगवू शकतात.
- भारतीय उपखंडाला 'जम्बूद्वीप' किंवा 'जम्बू वृक्षांची भूमी' म्हणून ओळखले जात होते. हे जम्बू वृक्ष दुसरे काही नसून जांभळाची म्हणजेच 'जावा प्लम'चीच झाडे आहेत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world