
Janmashtami 2025 Puja Tips: हिंदू धर्मामध्ये सर्व व्रतांमध्ये जन्माष्टमीचे व्रत देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कृष्णभक्त या उत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमी तिथीस जन्माष्टमी (Janmashtami 2025 Date) सण साजरा केला जातो. या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी काही गोष्टींचा उपाय केल्यास भगवंताची कृपादृष्टी होण्यास मदत मिळेल. कृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबाबत माहिती जाणून घेऊया...
पंचांगानुसार यंदा 15 ऑगस्टला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाणार आहे.
श्रीकृष्णाला या 5 गोष्टी करा अर्पण |Shri Krishna Upay Tips
जन्माष्टमीची (Janmashtami 2025 Puja) पूजा योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी व्रताच्या दिवशी देवाला पाच गोष्टी अर्पण कराव्या. हिंदू मान्यतेनुसार कृष्णाला साखर, लोणी, पंजिरी, पंचामृत आणि मखाण्याची खीर अर्पण केली तर श्रीकृष्ण प्रसन्न होतात तसेच ते आपल्या भाविकांवर आशीर्वादाचा वर्षावही करतात. देवाला त्याच्या या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास केल्या तर 56 नैवेद्य अर्पण केल्याइतकेच पुण्य मिळते, असे म्हणतात.

जन्माष्टमीदिवशी या मंत्रांचा जप करावा
देवाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वाधिक प्रभावी उपाय मानला जातो. त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठीही तज्ज्ञमंडळी मंत्रांचा जास्तीत जास्त जप करण्याचा सल्ला देतात. जन्माष्टमीला श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी माळेने खालील दिलेल्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
ॐ क्लीं कृष्णाय नमः ||
ॐ श्री कृष्णः शरणं ममः ||
ॐ नमो भगवते श्री गोविन्दाय: ||
ॐ श्री कृष्णः शरणम् ममः ||

जन्माष्टमी दिवशी हे उपाय केल्यास मनातील इच्छा होईल पूर्ण
जन्माष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण श्रीकृष्णाने स्वतः गीतेत म्हटलंय की,'झाडांमध्ये मी पिंपळाचे झाड आहे'. या पार्श्वभूमीवर जन्माष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते.
- भगवान श्रीकृष्णाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी दररोज गीतेचे पठण करावे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा.
- श्रीकृष्णाला गाय अतिशय प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी गोसेवा करावी तसेच गायीची पूजा देखील करावी.
- भगवान श्रीकृष्णाला तुळश अतिशय प्रिय आहे. जन्माष्टमीला नैवेद्यासह तुळशीपत्रही अर्पण करावे. या दिवशी तुळशीच्या रोपाची सेवा आणि पूजाही करावी.
- जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा.
सच्च्या भक्तीचे भुकेला देव
- भगवान श्रीकृष्णाची सच्च्या मनाने पूजा, भक्ती करावी.
- जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन पूजा करणे किंवा घरामध्येही विधीवत पूजा करणे शक्य नसल्यास मानस पूजा करावी.
- भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world