आजच्या काळात जीन्स हा प्रत्येकाच्या कपाटातील आणि फॅशनचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. जीन्स खरेदी करताना आपण सर्वांनीच तिच्या उजव्या बाजूला असलेला एक अत्यंत लहान खिसा पाहिला असेल. दिल्लीच्या सलो'हा खिसा नेमका कशासाठी असतो?' असा प्रश्न अनेकांना पडतो.
खिशाचा आकार इतका लहान होता की त्यात साधा मोबाईलही ठेवणे अशक्य होते. जर यात काही ठेवताच येत नाही, तर मग जीन्स बनवणाऱ्या कंपन्या हा खिसा देतातच कशासाठी? असा प्रश्न पडू शकतो. जीन्सच्या या छोट्या खिशाला'वॉच पॉकेट' असे म्हटले जाते. याची सुरुवात 1873 मध्ये 'Levis' कंपनी आणि शिंपी जॅकब डेविस यांनी केली होती, जी त्या काळी पॉकेट वॉच सुरक्षित ठेवण्यासाठी बनवली गेली होती.
(नक्की वाचा- Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)
या छोट्या खिशाला नक्की म्हणतात काय?
जीन्ससमध्ये मुख्य खिशाच्या वर असलेल्या या छोट्या खिशाला फॅशन आणि कपड्यांच्या भाषेत "वॉच पॉकेट" किंवा 'कॉइन पॉकेट' असे म्हटले जाते.
कधी झाली या खिशाची सुरुवात?
जीन्समध्ये या लहान खिशाची रचना आजची नाही, तर याला 150 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे. जीन्समध्ये हा खिसा देण्याची अधिकृत सुरुवात 1873 मध्ये झाली होती.
हा खिसा बनवण्यामागचे मुख्य कारण काय होते?
पूर्वीच्या काळात आजच्यासारखी हातावर बांधायची घड्याळे नव्हती. त्या काळी बहुतांश लोकांकडे, विशेषतः खाणीत काम करणारे मजूर आणि कामगारांकडे साखळी असलेली गोलाकार घड्याळे असायची. ज्याला 'पॉकेट वॉच' म्हटले जायचे.
घड्याळ्याच्या सुरक्षेसाठी खिसा
काम करताना हे घड्याळ इतर वस्तूंसोबत राहून फुटू नये, स्क्रॅच पडू नयेत किंवा कुठेतरी पडून खराब होऊ नये, यासाठी जीन्समध्ये हा विशेष छोटा खिसा तयार करण्यात आला होता. या खिशात घड्याळ अगदी चपखल बसायचे आणि सुरक्षित राहायचे.
(नक्की वाचा- Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)
हा खिसा सर्वात आधी कोणी तयार केला?
जगातील सर्वात पहिली अधिकृत जीन्स बनवणारी प्रसिद्ध कंपनी Levi's आणि त्यांचे शिंपी जॅकब डेविस यांनी मिळून 1873 मध्ये पहिल्यांदा या 'वॉच पॉकेट'ची रचना केली होती.
आजही खिसा का बनवला जातो?
काळाच्या ओघात आता 'पॉकेट वॉच' इतिहासजमा झाली असून त्यांची जागा स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचने घेतली आहे. तरीही आजच्या काळात लोक या खिशात नाणी, अंगठी, लहान चाव्या, पेनड्राइव्ह किंवा यूएसबी ड्राईव्ह, लायटर आणि गॅजेट्सचे इयरबड्स ठेवण्यासाठी याचा वापर करतात.