Jeep Car: देशातील फक्त 85 लोकांना मिळणार जीपची ही खास कार; 52 बोलणाऱ्या AI सह अनेक भन्नाट फीचर

Jeep ने आपल्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात Jeep Meridian 85th Anniversary Edition ही स्पेशल एडिशन SUV लॉन्च केली आहे. संपूर्ण भारतात या प्रीमियम SUV च्या फक्त 85 युनिट्स विकल्या जाणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसिद्ध एसयूव्ही (SUV) निर्माता कंपनी जीपने (Jeep) आपल्या 85 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा जल्लोष साजरा करत भारतीय बाजारात 'Jeep Meridian 85th Anniversary Edition' ही exclusive SUV लॉन्च केली आहे. ही केवळ एक साधारण SUV नसून, भारतासाठी कंपनीने या मॉडेलच्या केवळ 85 युनिट्स लिमिटेड एडिशन्स बनवल्या आहेत. जीपच्या लोकप्रिय Overland ट्रिमवर आधारित या स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 36.05 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.

'CARA AI' वॉयस असिस्टंट: 52 भाषांमध्ये साधणार संवाद

या नवीन SUV चे सर्वात मोठे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेला 'CARA AI' वॉयस असिस्टंट. हा AI असिस्टंट तब्बल 52 वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतो, ज्यामध्ये अनेक प्रमुख भारतीय भाषांचाही समावेश आहे. ड्रायव्हर केवळ बोलून नेव्हिगेशन, हवामानाची माहिती, फोन कॉल, म्युझिक, रिमाइंडर्स आणि कारचे अनेक फीचर्स थेट नियंत्रित करू शकतो.

Advertisement

अॅग्रेसिव्ह लुक अन् मायन गोल्ड इंटीरियर

कारला अधिक अॅग्रेसिव्ह आणि स्पोर्टी लुक देण्यासाठी 18-इंच ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. तसेच कारवर '85th Anniversary' चा खास लोगो/बॅज लावण्यात आला आहे. केबिनला ऑल-ब्लॅक प्रीमियम थीम देण्यात आली आहे, ज्यासोबत मायन गोल्ड फिनिशिंग जोडण्यात आली आहे. यामुळे केबिन अत्यंत आलिशान वाटते.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

'Anniversary AXS' खास एक्सेसरी पॅकेज

गाडीला आणखी वेगळा लुक देण्यासाठी जीपने यासोबत विशेष 'Anniversary AXS' पॅकेज सादर केले आहे. यामध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहेत.

  • प्रीमियम कारपेट फ्लोअर मॅट्स
  • एक्सक्लूसिव्ह अॅनिव्हर्सरी डेकल्स 
  • अॅम्बियंट लाइटिंग 
  • स्काई लाउंज सनरूफ इल्युमिनेशन 

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

बुकिंग सुरू

जर तुम्हाला ही सुपर-एक्सक्लूसिव्ह 7-सीटर SUV खरेदी करायची असेल, तर तिची अधिकृत बुकिंग सुरू झाली आहे. ग्राहक जीप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ही कार बुक करू शकतात.
 


Topics mentioned in this article