- जिरे हे फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असून आरोग्यासाठी उपयुक्त आहे
- सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्याने पाचन सुधारते, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
- जिरे पाणी मेटाबॉलिझम वाढवून वजन नियंत्रणात मदत करते आणि अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास सहायक आहे
स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये जिऱ्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ फोडणीसाठीच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही जिरे बहुगुणी मानले जाते. जिऱ्यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे थक्क करणारे आहेत. त्यामुळेच जीऱ्याचे पाणी हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.
1.पचन संस्था:
- जिऱ्याचे पाणी पाचक एन्झाइम्सना उत्तेजित करते. यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
2.वजन नियंत्रण:
- मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त कॅलरीज जाळण्यासाठी जिऱ्याचे पाणी मदत करते. नैसर्गिकरीत्या वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
3.रोगप्रतिकारशक्ती:
- शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी जिऱ्यातील दाहशामक गुणधर्म उपयुक्त ठरतात.
4.ब्लड शुगर:
- इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे पाणी मदत करू शकते.
असे बनवा जिऱ्याचे पाणी
हे पाणी बनवणे अत्यंत सोपे आहे. रात्री एक ग्लास पाण्यात 2 चमचे जिरे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून घ्या आणि कोमट असताना चहासारखे प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात लिंबू किंवा मध देखील घालू शकता. विशेषतः ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा ज्यांना पोटाच्या तक्रारी वारंवार जाणवतात, त्यांच्यासाठी हे पाणी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठीही हे अत्यंत गुणकारी मानले जाते. आजपासूनच हा छोटासा बदल आपल्या दिनचर्येत करून पहा.