- भाज्यांच्या सालींमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा समृद्ध स्रोत असतो
- बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे पचन सुधारते आणि पोट भरलेले राहते
- काकडीच्या सालीत फायबर आणि व्हिटॅमिन के असल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते
Which Vegetables Should Be Eaten Without Peeling: भाज्यांमधील पोषणमूल्ये टिकवण्यासाठी सालीसकट त्या खाणे आवश्यक आहे. आपल्याकडे भाजी करताना सर्वात आधी तिची सालं काढली जातात. मात्र, डॉ. शालिनी सिंह साळुंखे यांच्या मते, काही भाज्यांच्या सालींमध्येच खरे पोषण दडलेले असते. या साली फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत असतात. जर तुम्ही सालं काढून या भाज्या खात असाल, तर तुम्ही नकळत आरोग्याला मिळणाऱ्या मोठ्या फायद्यांना मुकावे लागते. त्यामुळे अशा भाज्यांची सालं काढू नका. त्या भाज्या कोणत्या ते आपण पाहाणार आहोत. त्या भाज्या जर तुम्ही साली काढून खात असाल तर ते योग्य नाही.
बटाटा:
- बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे पचन सुधारण्यास आणि बराच वेळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते.
काकडी:
- काकडीच्या सालीत फायबर आणि व्हिटॅमिन 'के' असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते.
वांगी:
- वांग्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
गाजर:
- गाजराच्या सालीमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि शरीराची सूज कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
भाज्यांच्या सालीमध्ये आरोग्याचं गुपित दडलं आहे. अनेकांना सवय असते की बटाटा असो वा काकडी, त्याची सालं काढूनच ती खाल्ली जातात. पण आरोग्य तज्ज्ञ डॉ. शालिनी सिंह यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, काही भाज्यांची सालं काढल्याने त्यातील पोषक तत्वे 50 टक्क्यांहून कमी होतात. त्यामुळे या भाज्या व्यवस्थित धुवून सालीसकट वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
नक्की वाचा - Washroom च्या दरवाजावर 'WC' का लिहिलेले असते? 99 टक्के लोकांना माहीत नाही याचा अर्थ
बटाटा सालीसकट खाल्ल्याने शरीराला लोह आणि पोटॅशियम मिळते. काकडीची साल वजन कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. वांग्याच्या जांभळ्या सालीमध्ये असे घटक असतात जे हृदयाला निरोगी ठेवतात. तसेच गाजर सालीसकट खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. मात्र, या भाज्या खाण्यापूर्वी त्या स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून त्यावरील माती आणि जंतू निघून जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world