जाहिरात

Navratri 2025 : 30 सप्टेंबर की 1 ऑक्टोबर, अष्टमी नक्की कधी आहे? फुलोरा अन् चक्रपूजा कधी मांडावी? 

यंदाच्या वर्षी एक तिथी दोन वेळेस आल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची होते. दहा दिवसांची नवरात्री झाल्यामुळे अष्टमी आणि नववीबाबत अनेकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. 

Navratri 2025 : 30 सप्टेंबर की 1 ऑक्टोबर, अष्टमी नक्की कधी आहे? फुलोरा अन् चक्रपूजा कधी मांडावी? 

Ashtami kadhi aahe 2025 september : नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. भारतातील अनेक टप्प्यात विविध प्रकारे देवीच्या वेगवेगळ्या रुपाची पूजा केली जाते. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरातही घटस्थापना केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी देवीचं विसर्जन केलं जातं. यंदाच्या वर्षी एक तिथी दोन वेळेस आल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची झाली आहे. दहा दिवसांची नवरात्री झाल्यामुळे अष्टमी आणि नववीबाबत अनेकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. याबाबतच महत्त्वपूर्ण माहिती या लेखातून दिली जाणार आहे.  

अष्टमी आणि नवमी कधी आहे? (Ashtami aani navmi kadhi aahe)

यंदा 30 सप्टेंबर, मंगळवारी अष्टमीची तिथी आहे. 

पंचागानुसार, 29 सप्टेंबर, सोमवारी सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांनी अष्टमी तिथीचा आरंभ होईल. 30 तारखेला सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांवर याची समाप्ती होईल.

1 ऑक्टोबर, बुधवारी सायंकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी नवमी तिथीची समाप्ती होईल. यानुसार 30 सप्टेंबरला अष्टमी आणि 1 ऑक्टोबरला नवमी असेल. 

2 ऑक्टोबर, गुरुवार - दसरा

महालक्ष्मी पूजन कधी करावे? 

सप्तमी : 29 सप्टेंबर, सोमवार - कडाकणी किंवा फुलोरा लावावा. सप्टमीला नऊ पुऱ्या, ९ साटोऱ्या, ९ करंज्या असा फुलोरा देवीला अर्पण करावा. प्रत्येक ठिकाणी फुलोऱ्याची वेगवेगळी पद्धत असते. काही ठिकाणी देवीच्या अगदी वरच्या बाजूला फुलोरा लावला जातो. काहीजण यासाठी स्टिलच्या स्टँडचा उपयोग करतात. 

सप्तमीला देवीला अशा प्रकारे फुलोरा लावला जातो

सप्तमीला देवीला अशा प्रकारे फुलोरा लावला जातो

अष्टमी : 30 सप्टेंबर, मंगळवार  - या दिवशी सायंकाळी चक्रपूजा करण्याची पद्धत आहे. 

अष्टमीच्या दिवशी चक्रपूजा अशा प्रकारे मांडली जातात.

अष्टमीच्या दिवशी चक्रपूजा अशा प्रकारे मांडली जातात.

चक्रपूजा कधी करतात? 

नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला चक्रपूजा केली जाते. ही चक्रपूजा सायंकाळी मांडण्याची प्रथा आहे. खरं तर ही युद्धामधील एक व्यूहरचना असल्याचं मानलं जातं. देवीचा असुरांशी झालेलं युद्ध म्हणजे चक्रपूजा. खान्देश आणि विदर्भात ही पूजा करण्याची पद्धत आहे. चक्रपूजा ही कुलदैवीची पूजा असते. चक्रपूजेमध्ये जमिनीवर चक्राकार रांगोळी काढली जाते. काही ठिकाी त्रिकोणी तर काहीजण गोलाकार रांगोळी काढून ही पूजा केली जातेय

कन्यापूजन कधी करावं? 

नवरात्रौत्सवातील नऊ दिवसांपैकी कधीही कन्या पूजन करू शकता.  परंतू अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करणं शुभ मानलं जातं.दोन ते दहा वर्षांच्या आतील मुलींचं कन्यापूजन करावं. घरी आलेल्या या कन्या म्हणजे देवीचं रुप मानलं जातं. या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ करावेत. अधिकांश खीर पुरी, शिरा करण्याची पद्धत आहे. वाणाच्या रुपात मुलींना भेटवस्तूही द्याव्यात. त्यांना गजरा, दक्षिणाही द्यावी. नऊ कुमारींकांना जेवू घालणं शक्य नसल्याने एक कुमारीकेचं पूजन केलं तरी चालतं. यासोबत भैरव म्हणून एका मुलाला नक्की बोलवावे. त्यालाही गोडाधोडाचं जेवण द्यावं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com