7th July Holiday: येत्या 7 जुलैला सुट्टी असणार की नाही? मोठ्या वीकेंडचं प्लॅनिंग करण्याआधी वाचा

जाहिरात
Read Time: 2 mins

July Holiday : येत्या 7 जुलै रोजी सुट्टी आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण 7 तारखेला सुट्टी मिळाली तर शनिवार (5 जुलै), रविवार (6 जुले) आणि सोमवार (7 जुलै) असा मोठा वीकेंट मिळेल. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी उत्सुक असणारे 7 जुलैला सुट्टी आहे की नाही याची वाट पाहत आहे. 

येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम असे हिंदू-मुस्लीम धर्मियांसाठी मोठे उत्सव एकाच दिवशी आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये मोहरमची सुट्टी ही 6 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. रविवार असल्याने मोहरमची वेगळी सुट्टी मिळणार नाही. 

(नक्की वाचा-  July Month Festival Calender: आषाढी एकादशी, गुरुपोर्णिमा ते श्रावण मास.. जुलै महिन्यातील सणांची संपूर्ण यादी)

 मात्र मोहरमची तारीख इस्लामिक कॅलेंडरनुसार ठरवली जाते, जी चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. इस्लामिक नवीन वर्ष देखील याच दिवशी सुरू होते. 2025 मध्ये मोहरमची संभाव्य तारीख 6 जुलै आहे. परंतु जर चंद्र उशीरा दिसला तर ती सुट्टी 7 जुलै (सोमवार) देखील असू शकते.

चंद्र पाहून मोहरमची तारीख ठरवली जाते. यावर्षीही 6 किंवा 7 जुलै ही तारीख योग्य असेल, हे चंद्रदर्शनानंतर ठरवले जाईल. म्हणूनच अनेक शाळा आणि सरकारी संस्था या संदर्भात अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत.

मोहरमची तारीख निश्चित झाल्यानंतरच सुट्टी रविवारी असेल की सोमवारी हे स्पष्ट होईल. ही राजपत्रित सुट्टी असल्याने, तारीख निश्चित झाल्यानंतर बहुतेक सरकारी संस्था, शाळा, कॉलेज त्या दिवशी बंद राहतील.

Advertisement

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये मोहरम साजरा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे मोहरमच्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे. 

(नक्की वाचा-  Government Job : SBI मध्ये अधिकारी बनण्याची संधी; 541 जागांसाठी मेगा भरती, कुठे कराल अर्ज?)

जुलै महिन्यात येणारे इतर महत्त्वाचे दिवस कोणते?

  • आषाढी एकादशी- 6 जुलै, रविवार
  • मोहरम- 6 किंवा 7 जुलै
  • संकष्ट चतुर्थी- 14 जुलै,सोमवार
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन-18 जुलै,शुक्रवार
  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती-23 जुलै,बुधवार
  • संत सावता माळी पुण्यतिथी- 23 जुलै,बुधवार
  • श्रावण मासारंभ- 25 जुलै,शुक्रवार
  • विनायक चतुर्थी- 28 जुलै,सोमवार
  • नागपंचमी- 29 जुलै,मंगळवार
Topics mentioned in this article