
SBI Job : बँकेत सरकारी नोकरी मिळवणे अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण तयारी देखील करतात. अशा सर्वांसाठी एक खुशखबर आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५४१ जागांसाठी नोकरी भरती होणार आहे. प्रोभेशनरी ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. यात अनुसूचित जाती ७५ जागा, अनुसूचित जमातींसाठी ३७ जागा, इतर मागासवर्गीय १३५ जागा, ईडब्लूएस ५० जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी २०३ जागा असणार आहेत. तर दिव्यांग उमेदवारांसाठी २० पदे राखीव असणार आहेत.
पात्रता काय असणार?
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील. २१ ते ३० वयोगटातील तरुणांना यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. https://sbi.co.in/web/careers/Current-openings या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. १४ जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज भरण्याच्या शुल्काची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
(नक्की वाचा- Genius kids: 'या' 5 गोष्टी तुमच्या मुलात असतील तर समजा तुमचं बाळ आहे जीनिअस)
पगार किती असणार?
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी वार्षिक २०.४३ लाख रुपये पगार असणार आहे. यामध्ये ४८ हजार ४८० रुपये ते ८५ हजार ९२० रुपये वेतनश्रेणी असणार आहे.
(नक्की वाचा- New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)
उमेदवारांची निवड कशी होणार?
उमेदवारांची तीन टप्प्यांमध्ये निवड केली जाणार आहे. यामध्ये सर्वात आहे. प्रिलिमिनरी परीक्ष जी जुलै ते ऑगस्ट २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. १०० गुणांसाठी असणाऱ्या या परीक्षेत ऑबजेक्टिव्ह प्रश्न असतील. दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा असेल जी सप्टेबर २०२५ मध्ये घेतली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सायकोमेट्रिक टेस्ट असणार आहे. जी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल. अभ्यासक्रम आणि इतर माहिती एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world