Junk Food For Kids : तुम्ही लहान मुलांना जंक फूड देताय? वेळीच थांबवा; धक्कादायक अहवाल समोर 

जंक फूडबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तुमच्या मुलांना तुम्ही वडापाव, बर्गर, पिझ्झा, चिप्स, कोल्डड्रिंक्स, केक, सँडविच देत असाल तर वेळीच थांबा.

जाहिरात
Read Time: 2 mins

Junk Food For Kids : जंक फूडबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तुमच्या मुलांना तुम्ही वडापाव, बर्गर, पिझ्झा, चिप्स, कोल्डड्रिंक्स, केक, सँडविच देत असाल तर वेळीच थांबा. अन्यथा तुमच्या मुलाला गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो. पालकांचे डोळे उघडणारा अहवाल संयुक्त राष्ट्राने जाहीर केला आहे. हा अहवाल पाहताच तुम्ही देखील तुमच्या मुलांना जंक फूडपासून चार हात दूर ठेवाल. लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय आणि याचा परिणाम म्हणजे 5 ते 19 वर्षांच्या मुलांना लठ्ठपणाच्या समस्याला सामोरं जावं लागत आहे. 

यूनिसेफने जाहीर केलेल्या नव्या रिपोर्टमधून याबाबत इशारा देण्यात आला आहे. यूनिसेफचं म्हणणं आहे की, 10 मधील एक मुलगा हा गंभीर आजारानं ग्रस्त आहे आणि या आजाराचं कारण आहे अल्ट्रा प्रोसेस्ड जंक फूड. अल्ट्रा प्रोसेस्ड जंक फूडमुळे मेंटल हेल्थसह शारिरीक विकासावर परिणाम होतो. जगभरात 18.8 कोटी लहान मुलं लठ्ठपणाचे शिकार आहेत. 

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड लहानग्यांपर्यंत सहज पोहोचतं आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आळस. पालकांचा आळस हा मुलांपर्यंत जंक फूड पोहोचवण्याचा मुख्य कारण आहे असं देखील या अहवालात म्हटलंय. मुळातच बौद्धिक, शारीरिक विकासासाठीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असणार्‍या मुलांना जंक फूड देणं पूर्णतः चुकीचं आहे. जंक फूडचा परिणाम हा डोळ्यांवर देखील होतो. जंक फूडमध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि झिंक यांसारखे पोषक घटक जवळजवळ नसतात. असे अन्न वारंवार खाल्ल्याने मुलांच्या डोळ्यांच्या पेशींना आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे, धूसर दिसणे, जळजळ होणे, कमी प्रकाशात दिसण्याची क्षमता घटणे अशा समस्या सुरू होतात.

Advertisement

नक्की वाचा - Side Effects Of Eating Wheat: गव्हाची पोळी रोज खाताय? यातील एक प्रोटीन आरोग्यासाठी ठरू शकते घातक

पंतप्रधान मोदींनी देखील लालकिल्ल्यावरून या वर्षाच्या सुरूवातीलाच लठ्ठपणाचा वाढता धोका सांगितला आहे. जेवणाच्या वेळा, त्याचबरोबर योग्य जेवण लहानग्यांना देणं गरजेचं आहे. कारण योग्य वयात योग्य सवयी लावल्या तर लहान मुलं ते लवकर स्वीकारतात आणि त्याच सवयी त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यूनिसेफने देखील आपल्या रिपोर्टमधून हेच जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आताच तुमच्या लहान मुलांना नो जंक फूड म्हणायची सवय लावा आणि आजारापासून चार हात दूर ठेवा

Topics mentioned in this article