
Side Effects Of Eating Wheat: तुमच्या ताटातील गहू किंवा गव्हाची पोळी पूर्वीप्रमाणे पौष्टिक नाहीय. यामागील मोठं कारण म्हणजे रासायनिक शेती, जे कित्येक आजारांचे कारण ठरतेय. आरोग्य निरोगी राहावे, यासाठी गव्हाचे जास्त प्रमाणात सेवन करणं टाळायला हवे. पूर्वी गव्हाची शेती अतिशय पारंपरिक पद्धतीने होत असे. पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे खत आणि सिंचनाद्वारे शेती केली जायची. त्यामुळे आताच्या गव्हापासून केलेले पदार्थ किंवा गव्हाची पोळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक कशी ठरू शकते, याबाबत CPU-PSI सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, योग अँड संस्कार संस्थेचे संचालक प्रो. राम अवतार यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया...
गहू खाण्याचे तोटे(Side Effects Of Eating Wheat)
केमिकलयुक्त शेती
पूर्वीच्या काळी पिकवले जाणारे धान्य आरोग्यासाठी पोषक असत. पण आता शेतीकरिता युरिया, कीटकनाशक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण अधिक असते. ग्लुटेन हे एक असे प्रोटीन आहे, जे काही लोकांच्या शरीरामध्ये सहजरित्या पचत नाही. यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, सांधेदुखी आणि वजन वाढीच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळेच तज्ज्ञमंडळी गहू न खाण्याचा सल्ला देतात.
(नक्की वाचा: Multigrain Roti Benefits: मल्टिग्रेन पोळी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे)
अख्ख्या धान्यांचे सेवन
काही लोक गव्हासोबत बाजरी, ज्वारी, नाचणी, चणे, मका यासारख्या कित्येक धान्यांचे सेवन करतात. या धान्यांमुळे शरीराला थंडावा मिळतो, अन्नाचे पचन सहजरित्या होते आणि लवकर भूक लागत नाही. बदलत्या लाइफस्टाइलनुसार आता लोक फिट राहण्यासाठी पुन्हा या धान्यांचे सेवन करू लागले आहेत. जगभरात या धान्यांची मागणी वाढतेय. त्यामुळे आता डोळे बंद करुन गहू खाणे टाळावे.
(नक्की वाचा: Ghee Jaggery Benefits: तूप लावलेल्या पोळीसोबत गूळ खाण्याचे फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world