
Badminton Player Jwala Gutta Donates Breast Milk: प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने एक अतिशय प्रेरणादायी आणि आदर्श काम केले आहे. तिने एका सरकारी रुग्णालयात 30 लीटर ब्रेस्ट मिल्क (आईचे दूध) दान केले आहे. तिच्या या स्तुत्य कृतीमुळे अनेक गरजू आणि अकाली जन्मलेल्या बाळांना जीवनदान मिळाले आहे. ज्वालाने स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती देत, या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रेरणा?
ज्वाला गुट्टा आणि तिचा पती, अभिनेता-निर्माता विष्णू विशाल यांना यावर्षी एप्रिलमध्ये कन्यारत्न झाले. तिच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर, ज्वालाने ब्रेस्ट मिल्क दान करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात तिने ‘एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते, "ब्रेस्ट मिल्कमुळे जीव वाचतात. अकाली जन्मलेल्या आणि आजारी बाळांसाठी हे दूध जीवन बदलणारे ठरते. तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही गरजू कुटुंबांसाठी हिरो ठरू शकता. याबद्दल अधिक माहिती घ्या, याबाबत जागरूकता पसरवा आणि मिल्क बँकांना सहकार्य करा!"
"Breast milk saves lives.For premature and sick babies, donor milk can be life changing. If you're able to donate, you could be a hero to a family in need. Learn more, share the word, and support milk banks! 💜 #BreastMilkDonation #DonateMilk #InfantHealth pic.twitter.com/qbMle3pgpR
— Gutta Jwala 💙 (@Guttajwala) August 17, 2025
अकाली आणि गरजू बाळांसाठी आधार
ज्वाला गुट्टाचा हा उपक्रम अनेक बाळांना मदत करणारा आहे. विशेषत: ज्यांच्या मातांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या बाळांचा जन्म अकाली झाला आहे. तसेच, गंभीर आजार असलेल्या बाळांनाही या दुधाचा उपयोग होणार आहे.
ज्वालाच्या या कृतीचे शल मीडियावरही खूप कौतुक होत आहे. अनेक युजर्सनी "तुमच्या कार्यामुळे जागरूकता वाढत आहे", "आईच्या दुधाला दुसरा उत्तम पर्याय म्हणजे दान केलेले दूध" आणि "तुमचा सलाम" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
( नक्की वाचा : Salad Benefits : लंचपूर्वी सलाड खाण्याचे 5 मोठे फायदे! तुमच्यात होईल आश्चर्यकारक बदल )
आमिर खानने केली होती मदत
ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीसाठी आमिर खानने खूप मदत केली होती. विष्णू विशालने एका मुलाखतीत सांगितले की, ज्वालाला आयव्हीएफ (IVF) उपचारात अनेक अडचणी येत होत्या. हे कळल्यावर आमिर खानने त्यांना मुंबईतील घरी बोलावले आणि एका चांगल्या डॉक्टरांकडे उपचार सुरू केले. तब्बल 10 महिने आमिरने ज्वालाला आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळले. या उपचारांचा ज्वालाला मोठा फायदा झाला.आम्ही मुलीचे नाव मीरा ठेवले आहे. तसंच त्यांनी आमिर खानला मुलीच्या नामकरण सोहळ्यासाठी बोलावले होते, असे विष्णू विशाल यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world