जाहिरात

Kala Dhaga: 'या' 3 राशींच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा! होईल मोठे नुकसान

त्यामुळे त्यांनी काळ्या धाग्याऐवजी या पवित्र रंगांचा वापर करावा, अन्यथा भाग्याची साथ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

Kala Dhaga: 'या' 3 राशींच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा! होईल मोठे नुकसान
  • ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा शनी ग्रहाशी संबंधित असून तो बांधल्याने शनीदेव प्रसन्न होतात
  • राहू आणि केतू यांच्या नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काळा धागा उपयुक्त
  • मकर आणि कुंभ राशीतील लोकांसाठी काळा धागा अत्यंत शुभ मानला जातो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

ज्योतिषशास्त्रामध्ये काळ्या धाग्याला विशेष महत्त्व आहे. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी अनेक जण पायात किंवा हातामध्ये काळा धागा बांधतात. मात्र, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, काळा धागा प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर ठरतोच असे नाही. ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी तो नुकसानकारक देखील ठरू शकतो. त्यामुळे काळा धागा कुणी बांधावा आणि कुणी बांधू नये हे आपण जाणून घेणार आहोत. 

वैदिक ज्योतिषानुसार, काळा रंग हा प्रामुख्याने शनी ग्रहाशी संबंधित मानला जातो. काळा धागा बांधल्याने शनी देव प्रसन्न होतात. शिवाय जीवनातील अडचणी कमी होऊन स्थिरता येते, अशी मान्यता आहे. याशिवाय राहू आणि केतू या छाया ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. काही विशिष्ट परिस्थितीत मंगळाचा आक्रमक स्वभाव शांत करण्यासाठीही काळा धागा उपयुक्त ठरतो.

नक्की वाचा - DMart News: डीमार्टमध्ये ‘या' वस्तू कधीच का मिळत नाहीत? समोर आले मोठे कारण

मकर आणि कुंभ या शनीच्या राशीच्या लोकांसाठी काळा धागा अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे त्यांच्या जीवनात शिस्त आणि स्थिरता येते. तसेच मेष आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असेल, तर त्यांचा राग आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्यास हा धागा मदत करतो. मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाची ऊर्जा संतुलित करण्यासाठी आणि राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळा धागा घालण्याचा सल्ला दिला जातो.

नक्की वाचा - भारतीय रेल्वेच्या सीट नेहमी निळ्या रंगाच्याच का असतात? कारण जाणून म्हणाल, रेल्वेने तर डोकं लावलं

सिंह राशी: सिंह राशीचा स्वामी 'सूर्य' आहे. सूर्य हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक मानला जातो. सूर्याची शनीशी शत्रुत्व भावना असल्याने सिंह राशीच्या व्यक्तींनी काळा धागा घातल्यास त्यांच्या सकारात्मक ऊर्जेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

धनु आणि मीन राशी: या दोन्ही राशींचा स्वामी 'गुरु' आहे. गुरु हा ज्ञान, धर्म आणि अध्यात्माचा कारक आहे. या राशीच्या लोकांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ असतो. त्यामुळे त्यांनी काळ्या धाग्याऐवजी या पवित्र रंगांचा वापर करावा, अन्यथा भाग्याची साथ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com