Akshaya Tritiya 2024: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथिला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) साजरी केली जाते. या दिवशी महत्त्वपूर्ण कार्यांचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेला लग्नसोहळ्यांपासून ते गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य केली जातात. यासह सोने खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानले जाते.
कधी आहे अक्षय्य तृतीया? (When Is Akshaya Tritiya 2024?)
यंदा 10 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. ज्योतिषाचार्यांच्या माहितीनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा अनेक शुभ योग (Yoga on Akshaya Tritiya) जुळून येत आहेत. या दिवशी सुकर्म योग जुळून आला आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्य कोणकोणते योग असणार आहेत? जाणून घेऊया सविस्तर...
अक्षय्य तृतीयेचे शुभ मुहूर्त
वेशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीय तिथिचा 10 मे रोजी पहाटे 4. 17 वाजेपासून शुभारंभ होणार असून 11 मे रोजी पहाटे 2.50 वाजेपर्यंत तिथि समाप्त होईल.
अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त
10 मे रोजी पहाटे 5 वाजून 33 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यतचा काळ शुभ आहे. या काळादरम्यान पूजा करू शकता. तसेच सोने खरेदीसाठी देखील कित्येक शुभ योग जुळून आले आहेत.
अक्षय्य तृतीयचे शुभ योग
ज्योतिषाचार्यांच्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुकर्म योगसह आणखी शुभ योग जुळून येत आहेत.
- सुकर्म योग - 10 मे रोजी दुपारी 12 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार असून 11 मे रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपर्यंत योग असणार आहे.
- रवी योग संपूर्ण दिवस असणार आहे.
- रवी आणि सुकर्म योग शुभ कार्य आणि सोने खरेदीसाठी शुभ मानले जातात.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रोहिणी आणि मृगाशिरा नक्षत्राचाही योगायोग आहे.
- दुपारी 3.29 वाजता तैतिल करण योगास शुभारंभ होत आहे. हे सर्व योग सोने खरेदीसाठी शुभ आहेत.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
VIDEO: कसे बनवले जातात सैन्यदलासाठीचे विशेष ड्रोन? 'सागर डिफेन्स'ची खास सफर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world