जाहिरात

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेला या 10 गोष्टी करा दान, भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची होईल मोठी कृपा

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यासही विशेष महत्त्व आहे. कोणकोणत्या गोष्टींचे दान केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळेल, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेला या 10 गोष्टी करा दान, भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची होईल मोठी कृपा
"Kartik Purnima 2025 Daan: कार्तिक पौर्णिमेला कोणत्या गोष्टींचे दान करावे?"
Canva

Kartik Purnima 2025: हिंदू धर्मामध्ये सणसमारंभादरम्यान देवीदेवतांची विशेष स्वरुपात पूजा केली जाते. सणांच्या पार्श्वभूमीवर कार्तिक महिना देखील विशेष मानला जातो, कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूला समर्पित असतो; असे म्हणतात. कार्तिक महिन्यामध्ये स्नान आणि दान केल्यास दुप्पट फायदे मिळतात, अशीही मान्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे कार्तिक पौर्णिमा दानधर्म करण्याच्या दृष्टिकोनातून फलदायी मानली जाते. 

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि धनधान्य, सुख-समृद्धीच्या आशीर्वादासह देवांची कृपा देखील होते, असे म्हणतात. तुम्ही कोणत्या गोष्टींचे दान करताय, हे देखील महत्त्वाचे आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करण्याचे मोठे महत्त्व आहे. कोणकोणत्या गोष्टी दान कराव्या, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

घर अन्नधान्याने भरेल

या दिवशी गहू, तांदूळ, डाळ, पीठ किंवा साखर या गोष्टींचे दान करू शकता. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या व्यक्ती अन्नाचे दान करते, त्यांचे घर अन्नधान्याने भरलेले राहते, असे म्हणतात.  

दीपदान करण्याचे महत्त्व

दीपदान करणंही शुभ मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घराजवळील एखाद्या मंदिरामध्ये किंवा घाटावर दीपदान करावे, असे केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. 

Tripuri Purnima 2025 Date And Shubh Muhurat: त्रिपुरी पौर्णिमा तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व एका क्लिकवर जाणून घ्या

(नक्की वाचा: Tripuri Purnima 2025 Date And Shubh Muhurat: त्रिपुरी पौर्णिमा तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व एका क्लिकवर जाणून घ्या)

तीन महत्त्वाच्या गोष्टी

तीळ, गूळ आणि तुपाचे दान करणेही शुभ मानले जाते, या तीन गोष्टींचे दान केल्यास निरोगी आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि भगवान विष्णू- लक्ष्मीमातेची कृपा सदैव राहते. यासह कपडे दान करणंही शुभ मानले जाते. ऊबदार कपडे किंवा गोधडी दान करावी, यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेच्या आशीर्वादामुळे पैशांची कमतरता निर्माण होत नाही. 

Happy Tripuri Purnima 2025 Wishes: त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे अंध:काराचा नाश, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Tripuri Purnima 2025 Wishes: त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे अंध:काराचा नाश, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा)

गोड पदार्थांचं दान

याव्यतिरिक्त गोड पदार्थ दान करू शकता किंवा ब्राह्मणांना भोजन करण्यासाठीही आमंत्रित करावे. 

दान करण्यापूर्वी या नियमांचं करा पालन

  • दान करण्यापूर्वी काही नियमांचंही पालन करणं आवश्यक असते. 
  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्नान नदीमध्ये स्नान करावे. 
  • शक्य नसल्यास घरामध्ये पाण्यात गंगाजल मिक्स करून स्नान करावे. 
  • चांगल्या भावनेनं आणि मनापासून दान करावे. 

Happy Kartik Purnima 2025 Wishes: शिवशंकर सुखसमृद्धीचा वर्षाव करो, कार्तिक पौर्णिमेच्या पाठवा मंगलमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Kartik Purnima 2025 Wishes: शिवशंकर सुखसमृद्धीचा वर्षाव करो, कार्तिक पौर्णिमेच्या पाठवा मंगलमय शुभेच्छा)

(Content Source : IANS )
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com