Tripuri Purnima 2025 Date And Shubh Muhurat: कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता, या घटनेच्या प्रित्यर्थ त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. 'त्रिपुरारी पौर्णिमा' (Tripurari Purnima 2025) किंवा कार्तिक पौर्णिमा (Kartik Purnima 2025) या नावानंही हा दिवस ओळखला जातो. यंदा त्रिपुरी पौर्णिमा (Tripuri Purnima 2025 Kadhi Ahe?) कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा जाणून घेऊया...
कार्तिक शुद्ध पौर्णिमा तिथी | Tripuri Purnima 2025 Tithi Start Time And End Time | Kartik Purnima 2025 Kadhi Ahe
कार्तिक शुद्ध पौर्णिमा तिथी प्रारंभ वेळ (Kartik Purnima Tithi Begins): 4 नोव्हेंबर 2025 रात्री 10.36 वाजता
कार्तिक शुद्ध पौर्णिमा तिथी समाप्त वेळ (Kartik Purnima Tithi Ends): 5 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 6.48 वाजता
यंदा त्रिपुरी पौर्णिमा कधी आहे? | Tripuri Purnima 2025 Date | When Is Tripuri Purnima 2025 | Tripuri Pournima 2025 Kadhi Ahe | Kartik Purnima 2025
पंचांगानुसार यंदा कार्तिक शुद्ध पौर्णिमा 5 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल.
त्रिपुरी पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त | कार्तिक पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त | Tripuri Purnima 2025 Shubh Muhurat
- अभिजित मुहूर्त : नाही
- विजय मुहूर्त: दुपारी 02:16 वाजेपासून ते दुपारी 03:01 वाजेपर्यंत आहे.
- गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 06:03 वाजेपासून ते संध्याकाळी 06:28 वाजेपर्यंत आहे.
- प्रदोष काळ : संध्याकाळी 5.15 वाजेपासून ते संध्याकाळी 7.50 वाजेपर्यंत आहे.
त्रिपुरी पौर्णिमा 2025 पूजा विधी | Tripuri Purnima 2025 Puja Vidhi | Kartik Purnima 2025 Date And Time
- पहाटे उठून नदीमध्ये स्नान करावे, शक्य नसल्यास घरामध्ये पाण्यात गंगाजल मिक्स करुन स्नान करावे.
- स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करावे.
- देवघरामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी चौरंग मांडून त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे.
- भगवान शिवशंकर, भगवान विष्णू आणि गंगामातेच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करावी.
- हळदकुंकू, अक्षता, देवतांच्या आवडीचे फळ-फुलं अर्पण करा. धूप-अगरबत्ती दिवा प्रज्वलित करावा.
- आरती-प्रार्थना करावी. श्री विष्णू चालिसेचे पठण करावे.
- देवांकडे सुख-समृद्धी, शांतीची प्रार्थना करावी.
- या दिवशी दीपदान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.
- गरजूंना आर्थिक किंवा अन्नदानही करावे.
- त्रिपुरी पौर्णिमेचे व्रत केल्यास पापांचा नाश होतो, असेही म्हणतात.
- भगवान शंकराच्या मंदिरात त्रिपुरी वात प्रज्वलित करण्याचीही प्रथा आहे.
- तसेच मोठ्या उंच दगडी खांबावरही दीपमाळ प्रज्वलित केली जाते.

Photo Credit: Canva
त्रिपुरी पौर्णिमेला देव दिवाळी 2025 कुठे साजरी केली जाते? Dev Deepawali 2025
उत्तर भारतामध्ये त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी (Dev Deepawali 2025| Dev Diwali 2025) साजरी केली जाते. घाटांवर दिवे प्रज्वलित करून गंगामातेची आरतीही करतात.
(नक्की वाचा: Tulsi Plant Care: हिवाळ्यात तुळशीचे रोप कसे राहील हिरवेगार? फॉलो करा या 3 टिप्स)
त्रिपुरी पौर्णिमा 2025 पौराणिक कथा | Tripuri Purnima 2025 Katha | Dev Deepawali 2025 | Dev Deepawali 2025 Date And Timeपौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाने तप करून शत्रूपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला. वर मिळाल्यानंतर त्याने देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. देवांनी भगवान शंकराला प्रार्थना केली, यानंतर तीन दिवस युद्ध करुन कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा शिवशंकराने वध केला. देवांनी या दिवशी दिवे प्रज्वलित करुन आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
