Keeping the mobile phone nearby while sleeping : तुम्हालाही मोबाइल फोन बेडजवळ किंवा उशीखाली ठेवून झोपण्याची सवय आहे? मग ही बातमी तुमची झोप खराब करेल...याच सवयीमुळे तुम्हाला अनेक धोके निर्माण होऊ शकतात. वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे. पण खरंच मोबाइल उशीजवळ ठेवून झोपताय तर मृत्यू होतो का? जाणून घेऊयात सत्य काय आहे?
मोबाइल अतिवापर टाळा...
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. मोबाइलचं वेड इतकं वाढलंय की, लोक कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीत मोबाइल वापरतात. अगदी जिथे जीवाला धोका असतो तिथेही! सर्वात मोठी चूक म्हणजे झोपताना मोबाइल उशीखाली ठेवणं. रात्रभर मोबाइल उशीखाली राहिल्यास तो गरम होतो आणि स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. आग लागण्याच्याही अनेक घटना घडल्यायत. एवढंच नाही तर तुमची झोपही बिघडू शकते. चांगली झोप आली नाही तर आपल्याला सकाळी उठल्यावर आळस येतो, थकवा जाणवतो.
खरंच मोबाईलमुळे जीव जाऊ शकतो का? काय करावं?
मोबाईल दूर ठेवा. झोपताना मोबाईल बेडपासून काही फूट अंतरावर ठेवा.
फोन डोक्याजवळ ठेवू नका. राऊटरही डोक्याजवळ ठेवणं टाळा.
मोबाईल बेडरूमपासून दूर ठेवा, शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा.
सतर्क राहा, झोपताना Wi-Fi राउटर बंद करा. ब्लूटूथ स्पीकर वापरत नसताना बंद ठेवा.
फोन गरम होऊ देऊ नका, चार्जिंगसाठी दर्जेदार बॅटरी आणि चार्जर वापरा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाइलवर अवलंबून राहण्याची सवय कमी करा.कारण मोबाईल स्क्रीनकडे सातत्याने पाहिल्याने नजरही कमकुवत होण्याची शक्यता असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
