जाहिरात

रात्री झोपताना स्वेटर घातल्याने काय होतं? ऊबदार कपडे घालून झोपू शकतो? शरीरावर काय परिणाम होतो?

रात्रीच्या वेळी स्वेटर किंवा अन्य गरम कपडे घालून झोपल्याने शरीरावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो. तुमच्या बेडरुमचं तापमान किती आहे यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

रात्री झोपताना स्वेटर घातल्याने काय होतं? ऊबदार कपडे घालून झोपू शकतो? शरीरावर काय परिणाम होतो?
रात्रीच्या वेळी स्वेटर घालून झोपल्याने काय होतं?
File Photo

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलीच थंडी पडली आहे. काही भागात तर अनेकजण दिवसभर स्वेटर घालून असतात, तर अनेकदा रात्री झोपतानाही स्वेटर घातलेलं असतं. मात्र रात्रीच्या वेळी स्वेटर घालून झोपल्यानं काय होतं, तुम्हाला माहीत आहे का? स्वेटर घालून झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतो, आरोग्य तज्ज्ञांनुसार, रात्रीच्या वेळी स्वेटर घालून झोपल्याने शरीराचं तापमान वाढू शकतं. ज्यामुळे अस्वस्थपणा, त्वचेवर चट्टे, रक्त प्रवाहात अडथळा आणि अनेक आरोग्यासंबंधित आजार उद्भवू शकतात. 

रात्रीच्या वेळी स्वेटर घालून झोपल्याने काय होतं?

आरोग्य तज्ज्ञांनुसार, रात्रीच्या वेळी स्वेटर किंवा अन्य गरम कपडे घालून झोपल्याने शरीरावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो. तुमच्या बेडरुमचं तापमान किती आहे यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वेटर घातल्याने शरीरात ऊब निर्माण होते म्हणून अनेकजण स्वेटर घालतात. मात्र यावेळी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हवं. 
 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Pexels

जास्त ऊब आणि असुविधा...

ऊबदार कपडे किंवा स्वेटर घालून झोपल्याने शरीराला अतिरिक्त ऊब मिळू शकते. चांगली झोप यावी यासाठी शरीराचं तापमान रात्रीच्या वेळी कमी असतं. मात्र जर तुम्ही स्वेटर घातलं तर शरीराच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. 

झोपेत व्यत्यय...

शरीराचं झोपेचं आदर्श तापमान साधारण १८ अंश सेल्सिअस ते २१ अंश सेल्सिअर इतकं आवश्यक आहे. जास्त ऊब निर्माण झाल्यास तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. तुम्ही वारंवार कूस बदलावी लागू शकते. घाम येणे, अस्वस्थत वाटणे यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. 

शांत राहण्याचे 10 जबरदस्त फायदे, जास्त शांत राहिल्याने काय होतं? जाणून घेऊया

नक्की वाचा - शांत राहण्याचे 10 जबरदस्त फायदे, जास्त शांत राहिल्याने काय होतं? जाणून घेऊया

घाम येणे आणि पाण्याची कमतरता...

ऊबदार कपडे घालून झोपल्याने गरम होऊ शकतं. गरम वाढल्याने घामाच्या माध्यमातून शरीर थंड होण्याचा प्रयत्न करतं. यामुळे रात्रीच्या वेळी शरीरात पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. परिणामी तु्म्हाला वारंवार तहान लागू शकते. 

Latest and Breaking News on NDTV

त्वचेची समस्या...

रात्रीच्या वेळी स्वेटर घालून झोपल्याने घाम येऊ शकतोआणि काही लोकांना घामामुळे त्वचेवर खाज, घामोळ्या येऊ शकतात. 
 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com