Khobryachya Wadya Recipe: तोंडात विरघळणारी हलवाई स्टाइल नारळ बर्फी आता बनवा फक्त 15 मिनिटांत, वाचा सोपी रेसिपी

Khobryachya Wadya Recipe: घरी झटपट आणि चविष्ट नारळ बर्फी (Khobryachya Wadya Recipe) बनवायची आहे का? ताज्या खोबऱ्यापासून बनवलेली ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी आजच ट्राय करा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nariyal Barfi Recipe in Marathi: खोबऱ्याच्या वड्यांची झटपट रेसिपी"
Canva

Khobryachya Wadya Recipe: नारळाची बर्फी (खोबऱ्याची वडी) ही एक पारंपरिक भारतीय मिठाई आहे, जी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. या मिठाईची रेसिपी देखील तितकीच सोपी आहे. विशेष म्हणजे ही मिठाई तयार करण्यासाठी खूप जास्त साहित्य किंवा वेळेची आवश्यकता नसते. तुमच्या घरी अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला काही गोड खाण्याची इच्छा झाली, तर ही रेसिपी झटपट तयार होऊ शकते. ताज्या किंवा सुक्या खोबऱ्यापासून हा गोड पदार्थ तयार केला जाते.  

खोबऱ्याच्या वड्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • दोन कप किसलेले खोबरे (ताजे किंवा सुके)
  • एक कप दूध
  • 3/4 कप साखर
  • 1/2 लहान चमचा वेलची पूड
  • 2 चमचे तूप
  • 8-10 बदाम किंवा पिस्ता (सजावटीसाठी)

(नक्की वाचा: Pudina Chutney: पुदिना चटणी काळी पडण्याचे कारण 99% लोकांना माहिती नसणार, चटणी फ्रेश राहण्यासाठी वापरा या टिप्स)

नारळाची बर्फी कशी तयार करावी?

  • सर्वप्रथम एका कढईत मध्यम आचेवर तूप गरम करा.
  • त्यात किसलेले खोबरे घालून 2-3 मिनिटे हलके परता, जेणेकरून त्याचा छान सुवास येईल.
  • त्यानंतर त्यात दूध टाका आणि मिश्रण सतत ढवळत राहा.
  • दूध थोडे घट्ट होऊ लागले की त्यात साखर घाला आणि नीट मिक्स करा.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
  • आता त्यात वेलची पूड टाकून व्यवस्थित मिसळा.
  • एका प्लेट किंवा ट्रेला तुपाचा हात लावून ग्रीस करा आणि खोबऱ्याचे मिश्रण त्यात पसरवा.
  • बदाम किंवा पिस्त्याचे काप मिक्स करा. 
  • हे मिश्रण 15-20 मिनिटे थंड होऊ द्या आणि नंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्या.
(नक्की वाचा: 60 Days Fruit Challenge: 60 दिवस रोज फळं खाल्ली आणि माझं संपूर्ण शरीरच बदलले... Gen-Z तरुणीचा थक्क करणारा अनुभव)काही महत्त्वाच्या टिप्स
  • तुम्ही दुधाऐवजी कंडेन्स्ड मिल्कचा वापर करू शकता.
  • बर्फी जास्त मऊ किंवा जास्त कडक होऊ नये म्हणून मिश्रणाच्या घट्टपणाकडे (Consistency) लक्ष द्या.
  • ताज्या खोबऱ्याचा वापर केल्यास चव अधिक उत्तम लागते.