Boiling Milk Tips: दूध गरम करणे हे एक सामान्य काम आहे, पण दूध उकळताना गॅसजवळ उभे राहावे लागते. कारण हे काम वरवर सोपे वाटत असलं तरीही ते कठीण आहे. दूध गरम करताना ते खाली सांडू नये आणि ओटा खराब होऊ नये, याचीच प्रत्येकाला काळजी असते. कारण दूध सांडल्यास नुकसानही होईल आणि कामही वाढते. एक साधीसोपी ट्रिक फॉलो केल्यास दुधाचा एकही थेंब भांड्यातून गॅसवर सांडणार नाही.
दूध पटकन गरम का होते?
दुधामध्ये प्रोटीन, फॅट्स आणि साखरेचंही प्रमाण असतं. दूध गरम करताना वाफेचे बुडबुडे तयार होऊन ते वरच्या दिशेनं येतात. पण हे बुडबुडे दुधाच्या तळाशी प्रथिने आणि फॅट्सच्या थराखाली अडकतात, ज्यामुळे दाब वाढतो आणि दूध पटकन उकळते. या दाबामुळे दूध वरील दिशेने येते आणि काही सेकंदातच सांडते.
(नक्की वाचा: Jaggery Chana Benefits In Winter: हिवाळ्यात गूळ आणि चणे खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनी सांगितले 5 फायदे)
दूध सांडू नये म्हणून सोपी पद्धत
जेव्हा दूध गरम करायला ठेवाल तेव्हा भांड्यावर एक स्वच्छ लाकडी चमचा ठेवा, ज्यामुळे दुधाचा तयार होणारा फुगा चमच्यामुळे फुटेल आणि दूध भांड्यातून बाहेर सांडणार नाही.
(नक्की वाचा: Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?)
लाकडी चमच्याचा का वापर करावा ?दूध गरम करताना लाकडी चमच्याचा वापर करावा, कारण तो अधिक प्रमाणात गरम होणार नाही. दूध सांडण्यापासून रोखण्याचे काम चमचा करू शकतो, त्यामुळे ही सोपी ट्रिक तुम्ही वापरू शकता.
(नक्की वाचा: Garlic Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसूण खाल्ल्यास काय होईल? कोणते लसूण खाणे पोषक ठरेल?)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)