जाहिरात

Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?

Sleeping On Stomach: पोटावर झोपल्यास काय-काय होते? रोज रात्री पोटावर झोपल्यास काय होत? जाणून घ्या माहिती

Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?
"Sleeping On Stomach: पोटावर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते का?"
Canva

Sleeping On Stomach: प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते, कोणी उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपतात, कोणी पाठीवर तर काहींना पोटावर झोपण्याची सवय असते. तुम्ही देखील पोटावर झोपता असाल तर आराम मिळत असेल पण कित्येकदा शरीराच्या आतील अवयवांवर ताण येतो. पोटावर झोपल्यास मान आणि कमरेच्या भागावर ताण येऊ शकतो तसेच श्वास घेण्यातही अडथळे निर्माण होतात. तरीही काहींना पोटावर झोपल्याशिवाय गाढ झोप येत नाही. पोटावर झोपण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत.   

पोटावर झोपल्यास काय होते? (What Happens When You Sleep On Stomach)

पोटावर झोपल्यास शरीराच्या पुढील बाजूस ताण येतो आणि पाठीच्या कण्यावरही परिणाम होतात. यामुळे कंबर आणि मानेचे दुखणे वाढू शकते. छातीवर दबाव आल्याने श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. सकाळी उठल्यानंतर शारीरिक वेदनाही जाणवतात.   

पोटावर झोपण्याची सवय चांगली आहे का? (Should You Sleep On Stomach)

पोटावर झोपण्याची सवय चांगली मानली जात नाही कारण हळूहळू शरीरावर अतिरिक्त ताण येऊ लागतो. पोटावर झोपल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसेल तर डोक्याखाली कमी उंचीची उशी ठेवा किंवा उशी न घेता झोपा, जेणेकरुन मानेवर ताण येणार नाही. थोड्या वेळासाठी पोटावर झोपणे ठीक आहे, पण दीर्घकाळ झोपणे शरीरास अपायकारक ठरू शकते. 

पोटावर झोपणाऱ्या व्यक्ती कशा असतात? (Stomach Sleepers Personality)

पोटावर झोपणाऱ्या व्यक्ती सरळ विचारसरणीच्या आणि स्पष्टवक्त्या असतात. हे लोक प्रामाणिक आणि जलद निर्णय घेण्याची क्षमता असणारे असतात. या लोकांना त्यांचे काम व्यवस्थितपणे करणं आणि गोष्टी नीटनेटक्या ठेवायला आवडते. स्वभाव मनमिळाऊ असतो आणि या लोकांशी संवाद साधणे अतिशय सोपे असते.   

One Minute Meditation: रोज सकाळी 1 मिनिट मेडिटेशन केल्यास काय होईल? योगगुरू हंसा यांनी सांगितली ध्यान करण्याची योग्य पद्धत

(नक्की वाचा: One Minute Meditation: रोज सकाळी 1 मिनिट मेडिटेशन केल्यास काय होईल? योगगुरू हंसा यांनी सांगितली ध्यान करण्याची योग्य पद्धत)

पोटावर झोपल्यास ढेरी कमी होते? (Why It Feels Good & Does It Reduce Belly Fat)

काही लोकांना पोटावर झोपणे आरामदायी वाटते, ताण कमी झाल्यासारखे वाटते. तर पोटावर झोपल्यास पोटावरची चरबी कमी होते, असा अनेकांना गैरसमज आहे. झोपण्याच्या कोणत्याही स्थितीत चरबी कमी होत नाही. पोटावरील चरबी कमी करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम. पोटावर झोपल्याने फक्त आराम मिळतो, वजन कमी (Weight Loss Tips) होत नाही.

Better Sleep Tips: दोन मिनिटांत येईल अगदी गाढ आणि शांत झोप, फॉलो करा 3 मिलिटरी टिप्स

(नक्की वाचा: Better Sleep Tips: दोन मिनिटांत येईल अगदी गाढ आणि शांत झोप, फॉलो करा 3 मिलिटरी टिप्स)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com