Jaggery Chana Benefits: हिवाळा ऋतूमध्ये शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदार गोष्टींची आवश्यकता असते. तुम्ही देखील नैसर्गिक पद्धतीने आरोग्य निरोगी ठेवण्याचा विचार करत असाल तर डाएटमध्ये गूळ आणि चण्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकते. गूळ - चणे एकत्रित खाल्ल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतील. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या YouTube चॅनेलवर गूळ आणि चणे खाण्याचे फायदे सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
गूळ आणि चणे खाण्याचे फायदे | Jaggery Chana Benefits In Marathi
शरीराला ताकद मिळते
डॉक्टर जैदी यांनी सांगितले की, गूळ आणि चणे खाल्ल्यास शरीराला लगेचच ऊर्जा मिळेल, विशेष म्हणजे शरीरातील ऊर्जा जास्त काळ टिकून राहते. हिवाळ्यामध्ये थकवा आणि आळस अधिक जाणवतो. म्हणून डाएटमध्ये गूळ-चण्याचा समावेश करावा.
पचनप्रक्रिया
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, गुळामुळे पाचक एंजाइम्स सक्रीय होतात, चण्यामध्ये फायबर अधिक असतात; ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळते.
हाडे मजबूत होतील
थंडीच्या दिवसांत सांधेदुखीची समस्या निर्माण होते, यावर उपाय म्हणून गूळ-चणे खाणे फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या माहितीनुसार चण्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम तर गुळामध्ये कॅल्शिअम हे गुणधर्म आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. सांधेदुखी किंवा संधिवात यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होतेगुळातील लोहाचे गुणधर्म नव्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात आणि रक्त देखील शुद्ध होते. चण्यामध्ये प्रोटीन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीर आतील बाजूनं मजबूत होतं. सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका होईल.
(नक्की वाचा: Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?)
त्वचेवर येईल तेजगूळ आणि चणे एकत्रित खाल्ल्यास अॅनिमिया म्हणजे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल, हा डाएट विशेषतः महिलांसाठी लाभदायक ठरेल. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्येतून सुटका मिळेल.
(नक्की वाचा: One Minute Meditation: रोज सकाळी 1 मिनिट मेडिटेशन केल्यास काय होईल? योगगुरू हंसा यांनी सांगितली ध्यान करण्याची योग्य पद्धत)
दिवसभरात किती प्रमाणात गूळ-चण्यांचे सेवन करावे?डॉक्टर जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित 25-30 ग्रॅम भाजलेले चणे आणि 15-20 ग्रॅम गूळ खाणे पुरेसे ठरेल. सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये गूळ-चण्याचे समावेश करू शकता. जास्त प्रमाणात गूळ-चणे खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे किंवा वजन वाढणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मर्यादित स्वरुपातच गूळ-चणे खावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

