How To Keep Green Chutney Fresh: उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. आपल्या आहारामध्ये पुदिन्याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही समावेश करू शकता. चटपटीत पुदिन्याची चटणी भजी, सामोसे किंवा अगदी वरण-भातासोबतही उत्तम लागते. पण गृहिणींची ही एकच तक्रार असते की चटणी तयार केल्यानंतर ती छान हिरवीगार दिसते, पण अर्ध्या तासानंतर तिचा रंग काळा किंवा गडद तपकिरी पडतो. तुम्हाला हाच अनुभव येत असेल तर चिंता करू नका. पुदिन्याची चटणी हिरवीगार राहावी, यासाठी काही साध्यासोप्या टिप्सची माहिती जाणून घेऊया...
हिरवी चटणी काळी का पडते?
हिरव्या रंगाची चटणी काळी पडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरच्या पानांमध्ये असलेले लोह (Iron). जेव्हा आपण मिक्सरमध्ये पुदिना किंवा कोथिंबीर वाटतो, तेव्हा मिक्सरची उष्णता आणि हवेच्या संपर्कामुळे यात ऑक्सिडेशन (Oxidation) प्रक्रिया सुरू होते. यामुळेच चटणीचा रंग काळा पडतो.
चटणी काळी पडण्यापासून वाचवण्यासाठी हे उपाय करा
चटणी हिरवीगार ठेवण्याचे सोपा उपाय म्हणजे बर्फाचे खडे (Ice Cubes). जेव्हा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटाल, तेव्हा साध्या पाण्याऐवजी दोन ते तीन बर्फाचे खडे टाका.
चटणी तयार करताना बर्फ वापरल्यास काय होईल?मिक्सर फिरताना खूप गरम होतो. यामुळे पुदिन्याची पाने शिजतात आणि त्यांचा रंग काळा पडतो. बर्फ टाकल्यामुळे मिक्सरचे तापमान थंड राहते आणि पानांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो.
(नक्की वाचा: Homemade Thick Curd: उन्हाळ्यात दही कसे तयार करावे? मार्केटसारखे घट्ट दही तयार करण्यासाठी फॉलो करा 10 स्टेप्स)
दह्याचा वापर
जर तुम्हाला बर्फ वापरायचा नसेल तर तुम्ही ताजे दही देखील वापरू शकता. दह्यामुळे रेस्टॉरंटस्टाइल हलक्या हिरव्या रंगाची चटणी तयार होईल आणि चटणीची चवही वाढेल.
पुदिना चटणी कशी तयार करावी? (How To Make Pudina Chutney)
पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून मिक्सर जारमध्ये घ्या. त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे किंवा चण्याची डाळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून वाटा. शेवटी वरून लिंबाचा रस मिक्स करावा.

Photo Credit: NDTV Marathi
आठवडाभर टिकवण्यासाठी कशी स्टोअर करावी? (How To Store Pudina Chutney)
चटणी साठवण्यासाठी नेहमी काचेच्या बरणीचा (Glass Jar) वापर करा. प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवल्यास तिची चव बदलू शकते. बरणीचे झाकण घट्ट ठेवा जेणेकरून हवा आत जाणार नाही. जर तुम्हाला ही चटणी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकवायची असेल, तर वाढतानाच त्यात मीठ घाला.
(नक्की वाचा: How To Reduce Roof Heat: उन्हाळ्यात तुमच्या घराचे छत प्रचंड तापतंय? फॉलो करा 4 सोपे उपाय, AC विनाच घर होईल थंडगार)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world