जाहिरात

फक्त 8,999 रुपयांत नवा स्मार्टफोन! 6,000mAh बॅटरी अन् AI कॅमेरा; पहिल्याच दिवशी मिळणार मोठी सवलत

Lava Budget Smartphone : अत्यंत वाजवी किंमतीत मोठा Display, दमदार AI Camera आणि पावरफुल Battery अशा अनेक भन्नाट फीचर्सचा समावेश या फोन्समध्ये करण्यात आला आहे.

फक्त 8,999 रुपयांत नवा स्मार्टफोन! 6,000mAh बॅटरी अन् AI कॅमेरा; पहिल्याच दिवशी मिळणार मोठी सवलत
Lava Budget Smartphone : या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.
मुंबई:

भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava International ने देशांतर्गत मोबाईल मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपले 2 नवीन बजेट स्मार्टफोन Lava Virat V1 5G आणि Lava Virat V1 4G भारतात अधिकृतपणे लाँच केले आहेत. अत्यंत वाजवी किंमतीत मोठा Display, दमदार AI Camera आणि पावरफुल Battery अशा अनेक भन्नाट फीचर्सचा समावेश या फोन्समध्ये करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन प्रत्येकी 2 आकर्षक Color Options मध्ये सादर करण्यात आले आहेत.

काय आहे किंमत?

Lava Virat V1 5G ची मूळ किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र पहिल्या दिवशी स्पेशल लाँच ऑफरअंतर्गत हा फोन केवळ 11,999 रुपये या सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. दुसरीकडे Lava Virat V1 4G ची मूळ किंमत 9,999 रुपये असून पहिल्या दिवशीच्या सेलमध्ये हा फोन तब्बल 8,999 रुपये या बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध होणार आहे.

या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि Lava च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल. ही खास सवलत फक्त पहिल्या दिवशीच्या सेलसाठीच लागू असेल. Lava Virat V1 5G हा Arya Blue आणि Sonar Gold रंगांमध्ये लाँच झाला आहे, तर Lava Virat V1 4G Nilgiri Blue आणि Himalayan Silver या रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने दोन्ही फोन्ससोबत Doorstep After-Sales Service देण्याची घोषणाही केली आहे.

( नक्की वाचा : 1 तारखेला बँक खाते पुन्हा शून्य; 2 लाख पगार असूनही 'या' चुकीमुळे 20 लाखांच्या कर्जात अडकला तरुण! )
 

Lava Virat V1 5G ची वैशिष्ट्ये

Lava Virat V1 5G हा स्मार्टफोन लेटेस्ट Android 16 वर काम करतो. फोनमध्ये 6.75 इंचचा मोठा HD+ Display देण्यात आला आहे. यामध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी Unisoc T8200 Processor सह 4GB RAM आणि 64GB Internal Storage मिळते. 

फोनमधील Virtual RAM च्या मदतीने RAM अतिरिक्त 4GB पर्यंत वाढवता येतो. त्याशिवाय MicroSD Card चा वापर करून स्टोरेज 1TB पर्यंत वाढवणे सहज शक्य आहे. यामध्ये 6,000mAh ची मोठी Battery देण्यात आली आहे.

( नक्की वाचा : SMS Fraud: मेसेज उघडताच बँक खाते रिकामे! ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार,'या'युजर्सना सर्वाधिक धोका )

Lava Virat V1 4G चे भन्नाट फीचर्स

Lava Virat V1 4G हा फोन Android 15 Operating System वर चालतो. या मॉडेलमध्येही 6.75 इंचचा HD+ Display मिळतो. हा स्मार्टफोन Unisoc SC9863A Processor सह सज्ज आहे. फोनमध्ये 4GB RAM, 4GB Virtual RAM आणि 64GB Internal Storage देण्यात आले आहे. पॉवरसाठी या मॉडेलमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी मिळते.

कॅमेरा आणि इतर फीचर्स

Lava Virat V1 5G आणि Virat V1 4G या दोन्ही स्मार्टफोन्सच्या मागील बाजूस AI आधारित Dual Rear Camera सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 13 Megapixel चा Primary Camera समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगची गरज पूर्ण करण्यासाठी दोन्ही फोन्समध्ये 5 Megapixel चा Front Camera देण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही फोन्सना IP64 Rating मिळाले आहे, ज्यामुळे धुळीचे कण आणि पाण्याचे हलके शिंतोडे उडाल्यास फोन सुरक्षित राहतो.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com