Law Stories : आधीच विवाहित, नवरा बेपत्ता, मुलीसोबत आईचंही अफेयर; डोकं चक्रावून टाकणारं प्रकरण

लग्नाच्या पहिल्या काही दिवसात पती-पत्नीमधील दुरावा क्षुल्लक वाटत असला तरी त्याचा धांडोळा घेतला तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Law Stories : लग्न जन्माजन्माचं बंधन असल्याचं म्हटलं जातं. मात्र कायद्याच्या चौकटीत लग्नाकडे केवळ भावनिक नजरेतून पाहता येत नाही. कारण आनंदासाठी केल्या जाणाऱ्या लग्नात अनेकदा अशा गोष्टी समोर येतात, ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. असे 'आऊट ऑफ सिलायबस' विषय समोर आले की त्याच्याशी लढणं सोपं नसतं.

वकील मधुरा देशपांडे यांनी त्यांच्याकडे आलेल्या धक्कादायक केसचा उलगडा 'ऑर्डर ऑर्डर पॉडकास्ट' या युट्यूब चॅनलवर केला आहे. हे प्रकरण एका उच्चभ्रू कुटुंबांमधील आहे. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात पती-पत्नीमधील दुरावा क्षुल्लक वाटत असला तरी त्याचा धांडोळा घेतला तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. 

Advertisement

तो घरी परतना अन् सर्व चित्र बदललेलं होतं...

दाम्पत्याचं नवं लग्न झालं होतं. मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये असल्याने लग्नाच्या महिनाभरात तो ड्यूटीसाठी शिपवर निघून गेला. जेव्हा हा तरुण पुन्हा घरी आला तेव्हा संपूर्ण चित्र बदललेलं होतं. मुलगी मुलाला जवळही येऊ देत नाही. संभाषणही करत नाही. पुढे जाऊन हे प्रकरण इतकं विकोपाला जातं की, आपलं सर्व सामान घेऊन तरुणी माहेरी निघून जाते. यादरम्यान तरुण तिच्याशी बोलण्याचा, प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती काहीच प्रत्युत्तर देत नाही. काही दिवसांनी मुलाचे वडिलही मुलीच्या माहेरी जातात, मात्र तिचे आई-वडिलही हे लग्न मोडण्याचा विषय मांडतात. लग्नानंतर पहिल्या महिनाभर त्यांच्यात शारिरीक संबंध आले नव्हते, विशेष म्हणजे मुलीकडून वारंवार त्याला विरोध केला जात होता. मुलाने मात्र मुलीला वेळ द्यायला हवा असा विचार केला आणि तो शांत राहिला.  

मात्र पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर परिस्थितीत विकोपाला गेली. पत्नी सासरी येण्यास तयार नव्हती. तिला लग्न टिकवायचं नव्हतं हे स्पष्ट होतं.  त्यावेळी मुलाच्या वकिलांनी शून्य विवाहाअंतर्गत (Void Marriage) (कलम १२, हिंदू विवाह कायदा) केस दाखल केली. हा घटस्फोट नसतो. मात्र याअंतर्गत पती किंवा पत्नी जाणीवपूर्वक किंवा इम्पोटन्सीमुळे शरीरसंबंध ठेवण्यास नकार देते हे सिद्ध करावा लागतं. पतीला पत्नीच्या दुराव्याचं नेमकं कारण लक्षात येत नव्हतं. नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्याने मधुरा देशपांडे यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला. सुरुवातीला पत्नीला सामोपचारासाठी इमेल करण्यात आला. मात्र पत्नीने याकडे दुर्लक्ष केलं. 

मुलीचं आधी लग्न, पती बेपत्ता, घटस्फोट न घेता दुसरं लग्न...
 
मुलाने मुलीची बॅगराऊंड तपासण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने डिटेक्टिव्हची मदत घेतली. त्यावेळी अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. त्यावेळी कळालं की, त्याच्या पत्नीचं अफेयर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईचंही एका मुलासोबत अफेयर असल्याचं समोर आलं.  यासंदर्भातील अनेक फोटोही त्याला मिळाले होते. पुढे जाऊन तर त्याला आणखी धक्का बसला. ज्या मुलीसोबत त्याने लग्न केलं होतं तिचं आधीच लग्न झालेलं होतं. या लग्नातून तिने घटस्फोटही घेतला नसल्याचंही त्याला कळालं. ज्या मुलासोबत तिचं लग्न झालंय त्याच्या घरी जाऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा कळालं की, या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे या लग्नानंतर तो मुलगा बेपत्ता आहे. 

ही सर्व घटना दुसऱ्या राज्यात घडलेली असल्यामुळे मुलीच्या कुटुंबाला ही सर्व घटना लपवून ठेवता आली. हळूहळू पुरावे तरुणाच्या हातात आले होते. कोर्टात मुलीला सादर करण्यात आलं. यावेळी या प्रकरणात ट्विस्ट आला. मुलीच्या वकिलांकडून सामोरपचाराची मागणी करण्यात आली. संतापजनक बाब म्हणजे मुलीच्या वकिलाने थेट ५० लाखांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. 

Advertisement

त्यानंतर मुलाच्या वकील मधुरा देशपांडे यांनी दोन्ही पक्षांची एक बैठक घेण्याचं ठरवलं. या बैठकीत त्यांनी मुलीच्या कुटुंबासमोर त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांचा उल्लेख केला. यामध्ये मुलीचं पहिलं लग्न, तिचा नवरा बेपत्ता असणं आणि मुलीच्या आईचं अफेयर याबाबत खुलासा करण्यात आला. यानंतर मुलीचे कुटुंबीय थबकले. त्यांना भीती वाटली. शेवटी शून्य विवाहाअंतर्गत हे लग्न रद्द करण्यात आलं. त्यावेळी मुलाने मात्र लग्नावेळी मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना दिलेले महागडे गिफ्ट, सोन्याच्या वस्तू परत देण्याची मागणी केली. शेवटी मुलीच्या कुटुंबीयांनीही सर्व वस्तू मुलाला परत केल्या आणि लग्न रद्द करून निरपराध मुलाची सुटका झाली.