LIC Recruitment: एलआयसीमध्ये बंपर भरती! तब्बल 92,000 पगार; कुठे अन् कसा कराल अर्ज?

LIC Recruitment 2025: इच्छुक आणि पात्र उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. कसा आणि कधी कराल अर्ज? जाणून घ्या

जाहिरात
Read Time: 3 mins

LIC Recruitment Job News:  तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि चांगल्या पगाराची नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO) पदाच्या एकूण 340 जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही भरती प्रक्रिया पदवीधर उमेदवारांसाठी असून, यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. कसा आणि कधी कराल अर्ज? जाणून घ्या सर्व माहिती. 

Free Courses: हार्वर्ड विद्यापीठातून 7 महत्वाचे कोर्स फुकटात करण्याची संधी; कसा आणि कुठे कराल अर्ज?

340 जागांसाठी भरती, पगार किती?

पदाचे नाव: असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (AAO - Generalist)
​एकूण पदे: 340
​वर्गवारीनुसार जागा: ​अजा (SC): 49 ​अज (ST): 26 ​इमाव (OBC): 99 ​आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS): 34 ​खुला (UR): 132 ​एकूण: 340
​याशिवाय, दिव्यांग उमेदवारांसाठी (PWD) LD-4, VI-8, HI-6, ID/MD-6 जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता: ​या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
​वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्षे ते कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ​अजा/अज (SC/ST): कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट (35 वर्षे) ​इमाव (OBC): कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट (33 वर्षे) ​अपंग (PwBD): कमाल वयोमर्यादेत 10 ते 15 वर्षांची सूट ​कर्मचारी/एजंट (LIC Employee/Agent): कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट

​पगार (वेतन): या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार मिळेल. अंदाजे मासिक वेतन रुपये 92,875/- असून, यामध्ये मूळ वेतन आणि इतर भत्ते (उदा. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहरावर आधारित विशेष भत्ता) समाविष्ट आहेत. मूळ वेतन रुपये 53,600/- पासून सुरू होते.
​अर्ज शुल्क: /अज/अपंग (SC/ST/PwBD) उमेदवारांसाठी: रुपये 85/-
​इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रुपये 700/- ​हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

Advertisement

Job in NASA : NASA मध्ये नोकरी मिळवण्यासाठी पात्रता काय लागते ? किती असतो पगार ? जाणून घ्या सगळी माहिती

निवड प्रक्रिया कशी असेल?

 या पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल: ​फेज 1: पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ​हा टप्पा केवळ पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी (Screening) आहे. यात मिळालेल्या गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. ​यात एकूण 100 प्रश्न 3 विभागातून विचारले जातील.  रिझनिंग ऍबिलिटी (35 प्रश्न), क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड (35 प्रश्न), आणि इंग्लिश लँग्वेज (30 प्रश्न). ​परीक्षेचा कालावधी 1 तास असेल.

Advertisement

​फेज 2: मुख्य परीक्षा (Main Exam): ​मुख्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. ​यात एकूण 300 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि 25 गुणांचा वर्णनात्मक (Descriptive) पेपर असेल. ​वर्णनात्मक पेपरमध्ये इंग्लिश लँग्वेजचा (पत्रलेखन आणि निबंध) समावेश असेल.

​फेज 3: मुलाखत (Interview): ​मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ​मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार केली जाईल.

Advertisement

कधी कराल अर्ज?

​ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 सप्टेंबर 2025
​पूर्व परीक्षा (Preliminary Exam) अंदाजित तारीख: 03 ऑक्टोबर 2025
​मुख्य परीक्षा (Main Exam) अंदाजित तारीख: 08 नोव्हेंबर 2025
​अर्ज कसा करावा: ​इच्छुक उमेदवारांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर 'Careers' सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व नियम आणि अटींची पूर्तता करावी. कोणत्याही अडचणीशिवाय अर्ज करण्यासाठी, लवकर अर्ज करणे उचित ठरेल

Topics mentioned in this article