
Harvard University Free Courses: जगातील अव्वल विद्यापीठांपैकी एक असलेल्या हार्वर्ड विद्यापीठाने 'सर्वांसाठी शिक्षण' (Education for All) हे उद्दिष्ट ठेवून विविध क्षेत्रांमध्ये विनामूल्य ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. हे कोर्सेस विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत. यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांना हार्वर्डसारख्या संस्थेकडून थेट शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने आर्ट, डिझाइन, व्यवसाय, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, शिक्षण, मानव्यशास्त्र, गणित आणि विज्ञान यांसारख्या अनेक विषयांमध्ये शेकडो विनामूल्य कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात सखोल ज्ञान मिळू शकते.
काही महत्त्वाचे विनामूल्य कोर्सेस
CS50 : Introduction to Computer Science
हा कोर्स विद्यार्थ्यांना अल्गोरिदम आणि समस्या सोडवण्याचे तंत्र शिकवतो. यात सी, पायथन, SQL आणि JavaScript सारख्या प्रोग्रामिंग भाषांचाही समावेश आहे.
CS50: Introduction to AI with Python
7 आठवड्यांच्या या कोर्समध्ये ग्राफ सर्च अल्गोरिदम, रिइंफोर्समेंट लर्निंग, मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) मूलभूत तत्त्वे शिकवली जातात.
Rhetoric: The Art of Persuasive Writing and Public Speaking
मानव्यशास्त्र (Humanities) आणि प्रभावी संवाद (Communication) कौशल्ये वाढवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. यात सार्वजनिक बोलण्याचे आणि प्रभावी लेखनाचे महत्त्व शिकवले जाते.
Introduction to Linear Models and Matrix Algebra
4 आठवड्यांच्या या कोर्समध्ये मॅट्रिक्स बीजगणित आणि डेटा विश्लेषणात (Data Analysis) त्याचा वापर कसा होतो, हे शिकवले जाते.
The Architectural Imagination
आर्ट आणि डिझाइनच्या विद्यार्थ्यांना वास्तुकलेचे (Architecture) विविध नमुने वाचणे, विश्लेषण करणे आणि त्यांचे अर्थ लावणे शिकवण्यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे.
Early Childhood Development: Global Strategies for Interventions
हा कोर्स लहान मुलांच्या विकासाला प्रभावीपणे कसे प्रोत्साहन द्यावे, यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच, पालकांसाठीही तो खूप उपयुक्त आहे.
Resilient Leadership
या कोर्समध्ये 'शॅकल्टन' आणि त्याच्या टीमने अंटार्क्टिकामध्ये जीवघेण्या संकटावर कशी मात केली, हे सांगून नेतृत्वाचे महत्त्वाचे धडे शिकवले आहेत.
इच्छुक उमेदवार हार्वर्डच्या अधिकृत वेबसाइट pll.harvard.edu वर जाऊन या विनामूल्य कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. जागतिक स्तरावर दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world