AIIMS Research On PCOS: आजकाल महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) चे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी ही समस्या केवळ शहरी महिलांपुरती मर्यादित मानली जात होती, परंतु आता ग्रामीण भागातही याची प्रकरणे नोंदवली जात आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि अनियमित दिनचर्या ही याची मुख्य कारणे आहेत. जर या समस्येवर वेळेवर नियंत्रण मिळवले नाही, तर त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि अगदी वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो.
एम्सच्या संशोधनातून काय समोर आले?
दरम्यान, एम्सने केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान केल्याने पीसीओएसची लक्षणे कमी होण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन एम्सच्या शरीरशास्त्र विभागातील मॉलिक्युलर रिप्रोडक्शन अँड जेनेटिक्स लॅबच्या प्राध्यापिका डॉ. रीमा दादा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. डॉ. रीमा यांच्या मते, देशात पीसीओएसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि बदलती जीवनशैली हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. तथापि, संशोधनातून असे दिसून आले आहे की, जर महिलांनी नियमितपणे योग, प्राणायाम आणि ध्यान केले, तर या स्थितीशी संबंधित अनेक लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.
Fridge Tips: फ्रिजरमध्ये एक रुपयांचं नाणं का ठेवताय लोकं? जबरदस्त ट्रिक.. फायदे जाणून चकित व्हाल
पीसीओएस (PCOS) झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात?
- पीसीओएसमुळे महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढू शकते आणि त्याचे परिणाम अनेक प्रकारे दिसून येतात:
- मासिक पाळी अनियमित होते
- वजन झपाट्याने वाढू शकते
- चेहऱ्यावर आणि शरीरावर नको असलेले केस वाढू लागतात
- मुरुमांची समस्या वाढू शकते
- गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते.
डॉ. रीमा स्पष्ट करतात की या समस्येवर लवकर उपाय करणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा महिलांच्या भविष्यातील प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
A recent study by our team at AIIMS Delhi, led by Dr. Rima Dada, highlights how adding regular yoga to standard medical care can truly help women dealing with PCOS.
— AIIMS, New Delhi 🇮🇳 (@aiims_newdelhi) June 17, 2026
The research shows that a simple, dedicated routine—including gentle asanas, pranayama, and meditation—can help… pic.twitter.com/IPR1EGbBoe
१०० हून अधिक महिलांवर केलेले संशोधन
या एम्सच्या (AIIMS) अभ्यासात १०० हून अधिक महिलांचा समावेश होता. या महिलांनी १२ आठवड्यांसाठी, आठवड्यातून पाच दिवस, दररोज ९० मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा सराव केला. अभ्यास पूर्ण झाल्यावर, संशोधकांना या महिलांच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल आढळले. दररोज योगाभ्यास केल्यामुळे महिलांची मासिक पाळी नियमित झाली.
यामुळे त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची पातळीही कमी झाली, ज्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर होणारी केसांची अतिरिक्त वाढ कमी झाली. मुरुमांची समस्याही कमी झाली आणि अनेक महिलांच्या वजनात सुधारणा झाली. काही महिलांनी असेही सांगितले की, त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यानाचा समावेश केल्यानंतर त्या गर्भधारणेत यशस्वी झाल्या.
याचे काय फायदे झाले?
- चयापचय आरोग्यात सुधारणा
- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत झाली
- वजन कमी होण्यास मदत झाली
- तसेच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासही मदत झाली
- महिलांमधील तणाव आणि नैराश्याची लक्षणे पूर्वीपेक्षा कमी झाली
पीसीओएससाठी कोणती योगासने फायदेशीर ठरू शकतात?
- बद्ध कोनासन
- सेतुबंधासन
- कोब्रा पोझ
- नौकासन
- मलासन
- सूर्य नमस्कार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world