माणूस Kiss करायला कधी आणि कसा शिकला ? संशोधकांनी शोधून काढले उत्तर

हे संशोधन उत्क्रांती आणि मानवी वर्तनासंबंधीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जिज्ञासा, प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधून काढण्याची प्रवृत्ती यामुळेच माणूस हा इतर सजीवांपेक्षा वेगळा ठरला आणि प्रगत होत गेला. जगभरातील संशोधक मानवी स्वभावाशी निगडीत विविध बाबींवर सातत्याने संशोधन करत असतात. माणसाने चुंबन घ्यायला म्हणजेच Kiss करायला कधीपासून सुरूवात केली, तो हे कसं शिकला हा प्रश्न काही संशोधकांना स्वस्थ बसू देत नव्हता. या संशोधकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांनी याबद्दलचं संशोधन केलं होतं. या संशोधकांना असे दिसून आले आहे की, 2 कोटी वर्षांपूर्वीच मानवाने चुंबन घेण्यास सुरूवात केली होती. मानवाची उत्क्रांती होण्याच्यापूर्वीपासून तो किस करू लागला होता. 

नक्की वाचा: पृथ्वीवरून झुरळं नष्ट झाली तर काय होईल ? वैज्ञानिकांनी शोधलेले उत्तर मानवाचे टेन्शन वाढवणारे आहे
 
कसे करण्यात आले संशोधन ?

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनी 'किस' करण्याची नेमकी सुरुवात कधी झाली, हे शोधण्यासाठी उत्क्रांतीचा अभ्यास केला. मानव, चिंपांझी, बोनोबोस, ओरंगुटान आणि गोरिला हे सर्व चुंबन घेतात. यावरून स्पष्ट होते की ही सवय आपल्या सामायिक पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळाली आहे. वैज्ञानिकांनी या प्राण्यांच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण केले.
हे संशोधन उत्क्रांती आणि मानवी वर्तनासंबंधीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. संशोधक डॉ. मटिल्डा ब्रिंडल यांनी सांगितले की, माहितीच्या विश्लेषणासाठी एक विशेष मॉडेल तयार करण्यात आले. हे मॉडेल अनेक लाखो वेळा चालवून पाहिले असता, पहिले चुंबन 2.1.कोटी वर्षांपूर्वी घेण्यात आले असावे, या निष्कर्षावर वैज्ञानिक पोहोचले. 

नक्की वाचा: अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास काय होईल? शरीराला मिळतील 5 फायदे

दोन भिन्न प्रजातीच्या मानवांनी एकमेकांना किस केल्याचा निष्कर्ष

सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी सेपियन मानव म्हणजे आधुनिक मानवाचा उदय झाला. हा उदय होत असताना त्या वेळी इरेक्टस या अतिप्राचीन जातीचे मानव अस्तित्वात होते. याशिवाय इतरही अनेक मानव जातींचे मानव अस्तित्वात होते. यामध्ये निअँडरथल मानवाचाही समावेश होता.  संशोधकांचे म्हणणे आहे की सेपियन मानव आणि निअँडरथल यांनी एकमेकांचा लिपलॉक पद्धतीने किस घेतला होता. एका नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनामध्ये मानवाने किस घेणे का सुरू केले असावे यावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खरं पाहाता असा पद्धतीने चुंबन घेतल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. डॉ. मटिल्डा ब्रिंडल यांनी म्हटलंय की चुंबन घेतल्याने समोरची व्यक्ती आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे की नाही हे ठरवणे सोपे जात असावे आणि लैंगिक उत्तेजना मिळवण्यासाठी किसचा वापर होत असावा.  

Advertisement
Topics mentioned in this article