Walnut Benefits: सुकामेव्याचे सेवन करणं फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यामध्ये सुकामेवा खाल्ल्यास शरीर उष्ण आणि निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. सुकामेव्यातील अक्रोड देखील आरोग्यासाठी पोषक आहे, पण अक्रोड भिजवून खावे की खाऊ नये? याबाबत बहुतांश लोकांचा कायम गोंधळ उडतो. तज्ज्ञमंडळींच्या माहितीनुसार दिवसभरात कमीत कमी दोन अक्रोड खाल्ले पाहिजे. अक्रोडमधील गुणधर्मांमुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त अक्रोड खाणे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी पोषक मानले जाते.
प्रसिद्ध डॉ. सलीम जैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात अक्रोडचे सेवन केल्यास शरीराची चयापचयाची गती जलद होते, रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, हृदय आणि मेंदूचे आरोग्य निरोगी राहते. रात्रभर अक्रोड भिजत ठेवून खाल्ल्यास कोणते फायदे मिळतात? अक्रोड खाण्याचे योग्य वेळ कोणती? जाणून घेऊया माहिती...
भिजवलेल्या अक्रोडचे सेवन का करावे?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अक्रोड पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजे. यातील काही एंझाइम्स भिजल्यानंतरच सहजरित्या पचतात. म्हणूनच अक्रोड भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अक्रोड भिजवल्यानंतर यातील फायटिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. पोषणतत्त्व शोषून घेण्याच्या शरीराच्या प्रक्रियेमध्ये हे अॅसिड अडथळे निर्माण करतं. अक्रोड भिजवून खाल्ल्यास शरीर व्हिटॅमिन आणि खनिजे सहजरित्या शोषून घेते.
ओमेगा 3 फॅटी अॅसिड
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे, जे आपल्या मेंदूच्या पेशीसाठी अधिक आवश्यक आहे. नियमित भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्र क्षमता वाढते. हेल्दी फॅट्समुळे रक्तातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.
(नक्की वाचा: गूळ भेसळयुक्त नाही, हे कसं ओळखायचं? MasterChefने सांगितलं हिवाळ्यात गूळ खरेदी करताना 3 गोष्टींची काळजी घ्या)
पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर
भिजवलेल्या अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर असते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
त्वचेसाठी लाभदायकअक्रोडचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर असते, कारण यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचा साठा मोठ्या प्रमाणात आहे; जे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते.
(नक्की वाचा: तीळ, भोपळ्याच्या बिया, अळशी... कोणत्या बिया कोणत्या वेळेस खाव्या? न्युट्रिशनिस्टने सांगितलं कधी मिळतील सर्वाधिक फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

