Skin Care: लिपस्टिक रोज वापरणाऱ्या महिलांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एम्स दिल्लीत शिक्षण घेतलेल्या एका त्वचारोगतज्ञांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले की, रोज लिपस्टिक वापरल्याने त्वचेला आणि आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. लिपस्टिकमधील काही रसायनांमुळे हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
अनेक महिलांना लिपस्टिकची इतकी सवय असते की, त्या घरामध्येही नेहमी लिपस्टिक लावून राहतात. पण रोजच्या या सवयीबद्दल एम्समधून शिकलेले आणि तिथेच प्रॅक्टिस केलेले त्वचारोगतज्ञ डॉ. इफ्तेखार खान यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांनी एका व्हिडिओमध्ये रोज लिपस्टिक लावल्याने त्वचेवर काय परिणाम होतात, हे सांगितले आहे.
(नक्की वाचा- वारंवार लघवी रोखणे किती धोकादायक असू शकते? काय होतात परिणाम?)
'गंभीर आजारांची शक्यता
डॉ. इफ्तेखार खान यांनी एका महिला रुग्णाचे उदाहरण दिले. या रुग्णाच्या चेहऱ्यावर मुरुमे आणि चेहऱ्यावर असामान्य केसांची वाढ दिसत होती. तिचे हार्मोनल तपासणी अहवाल सामान्य होते, पण तिच्या सवयींची माहिती घेतल्यावर एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे ती रोज वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक्स आणि ग्लॉसचा वापर करत होती.
डॉक्टरांच्या मते, अनेक लिपस्टिक्समध्ये 'बिस्फेनोल ए', फायलेट्स आणि पॅराबेन्स सारखी रसायने असतात. ही रसायने 'एंडोक्राइन डिसरप्टर्स' म्हणून काम करतात. ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. यातून हार्मोन्सशी संबंधित मुरुमे, चेहऱ्यावर केस येणे आणि भविष्यात वंध्यत्व सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही लिपस्टिक्समध्ये 'लेड' आणि 'केल्मियम' सारखे 'हेवी मेटल्स' देखील आढळले आहेत, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात.
(नक्की वाचा- फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळं, आरोग्यावर होतो वाईट परिणाम)
लिपस्टिक निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा
- लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटकांची यादी नक्की तपासा.
- ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून लिपस्टिकचा जास्त वापर करणे टाळा.
- दुसऱ्या कोणाचीही लिपस्टिक वापरू नका, कारण त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
- विश्वासार्ह ब्रँड्सची लिपस्टिक निवडणे आरोग्यासाठी सुरक्षित ठरू शकते.