जाहिरात

List Of Ekadashi In November 2025: नोव्हेंबरमध्ये कधी आहे एकादशीचे व्रत? तिथी आणि पारणाचा शुभ मुहूर्त वाचा

List Of Ekadashi In November 2025: एकादशीचे व्रत केल्यास सर्व पाप, दोष आणि कष्ट दूर होण्यास मदत मिळते, असे म्हणतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण किती एकादशी आहेत? तारीख, तिथी आणि पारण करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया...

List Of Ekadashi In November 2025: नोव्हेंबरमध्ये कधी आहे एकादशीचे व्रत? तिथी आणि पारणाचा शुभ मुहूर्त वाचा
Ekadashi 2025: नोव्हेंबर महिन्यातील एकादशी तारीख आणि शुभ मुहूर्त
NDTV

November 2025 Ekadashi Date And Time: भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकादशीचे व्रत. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला एकादशीच्या व्रताचे पालन केले जाते. सनातन परंपरेनुसार हे व्रत तीन दिवसांचे मानले जाते. उपवास सुरू करण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच विधीस सुरुवात केली जाते आणि व्रताच्या दुसऱ्या दिवशी पारण करण्याची परंपरा आहे. दुःख-अडचणी दूर करण्यासाठी तसेच सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे एकादशीचे व्रत नोव्हेंबर 2025 मध्ये कधी आहे, व्रताची तारीख, तिथी, पारण शुभ मुहूर्त कधी आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...  

नोव्हेंबर महिन्यातील पहिले एकादशीचे व्रत | Dev Uthani Ekadashi 2025 Date And Time

भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होणारे देवउठनी एकादशीचे व्रत 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी केले जाऊ शकते. काशीतील प्रसिद्धी पंडित विनय कुमार पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी (Dev Uthani Ekadashi 2025) आहे आणि वैष्णव परंपरेचे पालन करणारे भाविक 2 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशीचे व्रत करतील. 

Latest and Breaking News on NDTV

1 नोव्हेंबर 2025: देवउठनी एकादशी तिथी शुभ मुहूर्त आणि पारण वेळ | Dev Uthani Ekadashi 2025 Tithi Shubh Muhurat Paran Time | 1st November 2025

- पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षाची एकादशी तिथी 1 नोव्हेंबर 2025 (शनिवारी) सकाळी 9.11 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबर 2025 (रविवारी) रोजी सकाळी 7.31 वाजता तिथी समाप्त होईल. 
- 1 नोव्हेंबर 2025 रोजी देवउठनी एकादशीचे व्रत करणाऱ्या दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेपासून ते दुपारी 03:47 वाजेदरम्यान व्रताचे पारण करावे. 

2 नोव्हेंबर 2025: देवउठनी एकादशी तिथी शुभ मुहूर्त आणि पारण वेळ | Dev Uthani Ekadashi 2025 Tithi Shubh Muhurat Paran Time On 2nd November 2025

जर तुम्ही वैष्णव परंपरेशी जोडलेले आहेत तर उदया तिथीनुसार देवउठनी एकादशीचे व्रत आणि पूजा 2 नोव्हेंबर 2025 रोजी करावे. व्रताच्या पारणाचा शुभ मुहूर्त 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:40 वाजेपासून ते सकाळी 08:57 वाजेदरम्यान आहे. 

Latest and Breaking News on NDTV

नोव्हेंबर महिन्यातील दुसरे एकादशीचे व्रत | November 2025 Ekadashi Date And Time

नोव्हेंबर महिन्यातील दुसरे एकादशीचे व्रत 15 नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला 'उत्पत्ती एकादशी'चे व्रत केले जाते. पंचांगानुसार उत्पत्ती एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी उत्तररात्री 12.49 (AM) वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर रोजी उत्तररात्री 02:37 (AM) वाजता तिथी समाप्त होईल. यानुसार 15 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाईल. 

एकादशीचे पारण 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 01:31 वाजेपासून ते दुपारी 03:45 वाजेदरम्यान करावे.

Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat: देवउठनी एकादशी तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

(नक्की वाचा: Dev Uthani Ekadashi 2025 Shubh Muhurat: देवउठनी एकादशी तारीख, तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या)

    (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
     

    Listen to the latest songs, only on JioSaavn.com