Bal Gangadhar Tilak Jayanti 2025: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार

Bal Gangadhar Tilak Jayanti 2025: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया…

जाहिरात
Read Time: 2 mins
Bal Gangadhar Tilak Jayanti 2025: लोकमान्य टिळक यांची जयंती

Bal Gangadhar Tilak Jayanti 2025: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती 23 जुलैला असते. 23 जुलै 1856 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला होता. चिखलगाव हे टिळक कुटुंबाचे मूळ गाव. लोकमान्य टिळक (Bal Gangadhar Tilak Jayanti 2025) हे आपल्या देशाचे असे स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी स्वराज्याची मागणी करुन ब्रिटिशांच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती. ब्रिटीश सत्तेला कडाडून विरोध केल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगामध्ये जावे लागले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचे खटलेही चालवले गेले.1897-98दरम्यान 18 महिन्यांसाठी त्यांना तुरुंगवास झाला. यानंतर 1908-1914 या काळात त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले. येथे ते तब्बल सहा वर्षे तुरुंगात होते, या बंदिवासादरम्यान त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांचे (Bal Gangadhar Tilak Jayanti 2025) विचार आजही सामाजिक एकतेसाठी मार्गदर्शक ठरतात.  लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे प्रेरणादायी विचार (Lokmanya Bal Gangadhar Tilak Jayanti 2025 Thoughts)

  1. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच."
  2. "धर्म आणि व्यवहारिक जीवन वेगळे नाहीत. संन्यास घेणे म्हणजे जीवनाचा परित्याग नव्हे. खरी भावना ही अशी असावी की, केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशाला आपले कुटुंब मानून एकत्रित काम करावे."
  3. "प्रगती ही स्वातंत्र्यात अंतर्भूत असते. स्वशासनाशिवाय ना औद्योगिक विकास शक्य आहे, ना राष्ट्रासाठी शैक्षणिक योजना उपयुक्त ठरतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे हे सामाजिक सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे."
  4. "हे खरे आहे की पावसाच्या अभावामुळे दुष्काळ पडतो. पण हेही तितकेच खरे आहे की, भारतातील लोकांमध्ये या संकटाचा सामना करण्यासाठी ताकद नाही."
  5. "जर देव अस्पृश्यता मान्य करत असेल, तर मी त्याला देव मानणार नाही."

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)