LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून कपात, चेक कर नवीन दर

LPG Prices July 2025: तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या

जाहिरात
Read Time: 2 mins
Commercial Gas Price in India 01 Jul 2025

Commercial Gas Cylinder Prices From July 1:  जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना खूशखबर मिळाली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 1 जुलैपासून देशभरात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 58.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हे सिलेंडर मुंबईत 1616 रुपयांना उपलब्ध होईल. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडर पूर्वीप्रमाणेच दराने उपलब्ध राहतील. 

(नक्की वाचा- 1st July 2025 Changes : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेल्वे भाडेवाढ, 1 जुलैपासून होतायत 13 मोठे बदल)

देशातील विविध शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती?

  • दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1723.50 रुपयांऐवजी 1665 रुपयांना उपलब्ध होईल. 

  • कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 57 रुपयांनी कमी झाली आहे. आता सिलेंडर 1769 रुपयांना उपलब्ध आहे.
  • चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1823.50 रुपयांना उपलब्ध होईल.
  • पटनामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा नवीन दर 1929.50 निश्चित करण्यात आला आहे.

जूनमध्येही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात 

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. हे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, रुपयाचे मूल्य आणि इतर अनेक घटकांवरून केले जाते. जूनमध्येही तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 24 रुपयांनी कमी केली होती. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केल्याने रेस्टॉरंट्स, फूड बिझनेस आणि ढाबे चालवणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

(नक्की वाचा- NPS vs Mutual Fund SIP: सेवानिवृत्ती नियोजनेसाठी काय चांगले? अधिक परतावा कुठे मिळेल?)

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत

सध्या घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत तशीच आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एप्रिल महिन्यात या सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जी 8 एप्रिलपासून लागू झाली. तेव्हापासून, घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहिले आहेत. नव्या दरांनुसार मुंबईत घरगुती सिलेंडर 852.50 रुपयांना उपलब्ध आहे. 

Advertisement