LPG Gas Safety Tips & Precautions For Home: बहुतांश वेळेस गॅस गळतीशी (गॅस लीक) संबंधित अनेक अपघातांच्या घटना समोर येत असतात, ज्यामध्ये एक छोट्यातील छोटा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो. किचनमध्ये गॅस लीक झाल्यास एक छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. जर तुमच्या घरातील एलपीजी गॅस लीक झाला तर काय करावे आणि काय करू नये? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
गॅस लीक झाल्यावर लगेच काय करावे? | LPG Gas Safety Tips
गॅस गळती आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. एलपीजी सिलिंडर आपल्याला जितकी सुविधा मिळते, तितकेच तो घातकही ठरू शकतो. भारत सरकारच्या वतीने लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत LPG गळती आणि सिलिंडर फुटल्यामुळे दरवर्षी सरासरी 850 ते 1,000 अपघात होतात. या घटनांमध्ये प्रामुख्याने निष्काळजीपणा आणि गळतीमुळे आग लागण्याच्या घटनांचा समावेश असतो. हे अपघात टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. नुकतेच बिहार पोलिसांनी या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करून महत्त्वाची माहिती दिली आहे.
(नक्की वाचा: LPG News: LPG Cylinder वापरणाऱ्यांनो सावधान! या नियमाचं उल्लंघन केलं तर घरी येणार सरकारी नोटीस, वाचा नवे नियम)
गॅस सिलिंडर लीक झाल्यानंतर काय करावे? (What to do if a gas cylinder leaks?)
गॅस गळती झाल्यानंतर काय काम करावे? याबाबतची माहिती बिहार पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केली आहे.
एलपीजीचा वापर सुरक्षित पद्धतीने करा. गॅसची गळती झाल्यास घाबरून जाऊ नका, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
गॅस लीक होताच लगेच करा या पाच गोष्टी
1. त्वरित गॅस रेग्युलेटर बंद करा.
2. सर्व दारे आणि खिडक्या उघडा, जेणेकरून गॅस बाहेर निघून जाईल.
3. विजेचे स्विच, पंखा किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करू नका.
4. काडेपेटी (माचिस), लायटर किंवा आगीची ठिणगी निर्माण करणारी कोणत्याही प्रकारची वस्तू वापरू नका.
5. सुरक्षित ठिकाणी जा आणि गॅस एजन्सी किंवा आणीबाणीच्या सेवेसाठी 112 नंबरवर कॉल करा.
(नक्की वाचा : LPG Cylinder Pipe Color: गॅस सिलिंडरचा पाइप केशरी रंगाचाच का असतो? कारण जाणून थक्क व्हाल गॅस गळती होत असताना 'या' चुका कधीही करू नका (Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)