LPG Cylinder Notice: जर तुमच्या घरात एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर वापरला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकार आता देशभरात पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) या सुविधेच्या वापरास प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. ज्या भागांमध्ये पीएनजीची (PNG) सुविधा उपलब्ध आहे, तिथे लोकांना हळूहळू LPGकडून PNGच्या पर्यायामध्ये बदलण्याच्या योजनेवर काम केले जात आहे. अशा परिस्थितीत काही लोकांना यासाठी नोटीस देखील पाठवली जाऊ शकते.
सरकारकडून हे पाऊल का उचलले जात आहे?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव नीरज मित्तल यांनी जारी केलेल्या एका पत्रकानुसार, जगातील सध्याची परिस्थिती पाहता एलपीजीवरील निर्भरता कमी करणे आवश्यक झाले आहे. विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) क्षेत्रात वाढत्या तणावामुळे गॅसचा पुरवठा आणि त्यांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.
याशिवाय एलपीजी गॅसवर सरकारला मोठा खर्चही करावा लागत आहे. अहवालानुसार ऑइल मार्केटिंग कंपन्यांना (OMCs) प्रत्येक एलपीजी सिलिंडरवर सुमारे 690 रुपयांचे नुकसान होत आहे. जर संपूर्ण वर्षाचा हिशोब केला, तर हे नुकसान सुमारे 1.38 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. इतकेच नाही तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत गरीब कुटुंबांना प्रत्येक सिलिंडरवर 300 रुपयांची अतिरिक्त सबसिडी (अनुदान) देखील दिली जाते. या योजनेवर सरकारला दरवर्षी सुमारे 19 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात.
(नक्की वाचा : Pune Metro: पुणे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू? स्टेशन संख्या, वैशिष्ट्यांसह वाचा माहिती)
कोणत्या लोकांना मिळू शकते नोटीस?
पीआयबीच्या (PIB) एका प्रसिद्धीपत्रकानुसार, तेल कंपन्या आणि सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपन्यांना काही विशिष्ट ग्राहकांना नोटीस पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:
1. जर तुमच्या घरात पीएनजी (PNG) कनेक्शन आहे, पण तुम्ही तुमचे एलपीजी (LPG) कनेक्शन अजूनही सरेंडर केलेले नाही, तर तुम्हाला नोटीस मिळू शकते. यामुळे एलपीजीच्या अनावश्यक वापराला आणि काळाबाजारीला आळा बसेल, असे सरकारचे मानणे आहे.
2. जर तुमच्या भागात पीएनजी पाइपलाइन टाकण्यात आली आहे आणि तरीही तुम्ही पीएनजी कनेक्शन घेतलेले नाही, तर तुम्हाला या मोहिमेतंर्गत जागरूक केले जाऊ शकते आणि नोटीस पाठवली जाऊ शकते.
(नक्की वाचा : Mumbai Monsoon: चिंता वाढली! मुंबईत धो-धो पाऊस कधी बरसणार? निसर्ग दाखवणार रौद्र रूप? हवामान विभागाचा नवा अंदाज)
ग्राहकांना दिलासा आणि नियमदुसरीकडे सरकारने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासाही दिला आहे. नवीन नियमांनुसार पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर तुम्ही 30 दिवसांच्या आत तुमचे एलपीजी कनेक्शन सरेंडर करू शकता. याव्यतिरिक्त भविष्यात जर तुम्ही अशा भागात शिफ्ट झालात जेथे पीएनजीची सुविधा उपलब्ध नाही तर तुम्ही ट्रान्सफर वाउचरचा (Transfer Voucher) पर्याय निवडू शकता. या वाउचरच्या मदतीने तुम्ही तुमचे एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करू शकाल. त्यामुळे जर तुमच्या भागात पीएनजीची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही त्याबाबत माहिती नक्की घेतली पाहिजे. तसेच जर तुमच्याकडे आधीपासूनच पीएनजी आणि एलपीजी ही दोन्ही कनेक्शन असतील तर नोटीस मिळण्यापूर्वीच एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे हा शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world