Best Wishes for HSC Class 12th Students: महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (5 मे 2025) जाहीर करण्यात आला आहे. वर्षभर मेहनत घेऊन कित्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास केला आणि यश मिळवले. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांना खास संदेश पाठवा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नक्की द्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. बारावीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला
आता आत्मविश्वासाने आयुष्याच्या नव्या पर्वाला सामोरे जा
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
2. तुमच्या मेहनतीला आणि चिकाटीला मिळालेलं हे यश आहे कौतुकास्पद
आजचा विजय उद्याच्या यशाची पायरी ठरो
मनःपूर्वक अभिनंदन!
3. स्वप्नांना दिशा आणि कष्टांना दिशा मिळाली
यशाच्या या सुंदर प्रवासाची ही केवळ आहे सुरुवात
पुढे अजून उंच भरारी घ्यायची आहे
4. तुमचं यश तुमच्या कुटुंबासाठी, शिक्षकांसाठी आणि समाजासाठी अभिमानाचं आहे कारण
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
(नक्की वाचा: Maharashtra Board HSC 12th Result LIVE: यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के, कोकण विभागाची बाजी)
5. यश म्हणजे केवळ गुण नव्हे
तर व्यक्तिमत्त्वाचा विजय
पुढेही अशीच करत राहा प्रगती
उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा!
6. बारावीचा टप्पा पार करत तुमचं आयुष्य नव्या संधींसाठी झालंय सज्ज
या संधींचं करा सोने
अभिनंदन आणि शुभेच्छा!
7. तुमचा आत्मविश्वास आणि कष्टाचे फळ फुलले
उद्याचा विश्वास या यशावर आधारित आहे.
यशाबाबत मनःपूर्वक अभिनंदन!
8. शिकणे कधीही थांबू नये
कारण ज्ञानच खऱ्या अर्थाने यशाचे आहे बीज
मिळवलेल्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!
9. आजचा हा क्षण तुमच्या यशाचा साक्षीदार आहे
तुमचे यश असेच पुढेही फुलत राहो
या मनापासून शुभेच्छा!
(नक्की वाचा: HSC Result 2025: यंदा बारावीचा निकाल 91%, कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी)
10. तुमचं हे यश अनेक नवख्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल
कष्ट, संयम आणि जिद्द यांचं हे आहे उत्तम उदाहरण
यशाबाबत मनःपूर्वक अभिनंदन!
11. बारावीच्या यशामुळे तुमचं स्वप्न साकार झालंय
हे यश पुढील वाटचालीत विश्वास देईल आणि नवे द्वार उघडतील
मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा!
12. तुमचं यश म्हणजे केवळ गुणपत्रक नव्हे
तर जिद्द, चिकाटी आणि कष्टांचा आहे विजय
या विजयाच्या पायावर यशस्वी आयुष्य उभे राहो
खूप खूप शुभेच्छा!
13. तुम्ही दाखवलेली मेहनत आणि मिळवलेलं यश इतरांसाठी ठरेल प्रेरणा
शिकण्याची ही जिद्द आयुष्यभर टिकू दे!
खूप खूप अभिनंदन!
14. आजचा दिवस तुमच्या जीवनात एक महत्त्वाचा ठरतोय टप्पा
पुढे अनेक आव्हाने आणि संधी तुमची पाहताहेत वाट
तयार राहा, यश केवळ तुमचंच आहे
15. उत्तम गुण मिळवणे ही एक मोठी जबाबदारीही असते
समाजात योगदान देण्याची
तुमचा पुढील टप्पा याहूनही अधिक यशस्वी ठरो!
अभिनंदन!
16. आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात!
स्वप्नांना बळ मिळो आणि यश सदैव तुमच्या पाठीशी राहो
हार्दिक शुभेच्छा!
17. यश हे थांबायचं ठिकाण नाही
तर पुढील विजयाचे उगमस्थान आहे
पुढे नवे ध्येय गाठा
आजच्या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन!
18. तुझं स्वप्न साकार झालं
आता आकाशाला गवसणी घाला
पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
19. तुझा आत्मविश्वास आणि प्रयत्न हेच तुझं खरं बळ आहे
हेच शस्त्र घेऊन पुढेही विजय मिळव!
मिळवलेल्या यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन!
20. तुझ्या यशाने मन आनंदून गेलं
तू इतरांसाठी खरेच प्रेरणादायी आहेस
तुझ्या यशावर खूप आहे अभिमान
कष्ट ही यशाची खरी गुरुकिल्ली
तू ती वापरून नव्या संधीचे दार उघडलंस
आता पुढे चालत राहा!