जाहिरात

भगवान महावीर यांच्या जन्मापासून ते त्यागापर्यंत,Mahavir Jayanti 2026 निमित्त जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

Mahavir Jayanti 2026: भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त महत्त्वाच्या 10 गोष्टी जाणून घेऊया. हा दिवस शांतता, अहिंसा आणि आध्यात्मिक जागरूकतेचा संदेश देतो.

भगवान महावीर यांच्या जन्मापासून ते त्यागापर्यंत,Mahavir Jayanti 2026 निमित्त जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
"Mahavir Jayanti 2026: महावीर जयंती यांच्याबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी"
File Photo

Mahavir Jayanti 2026: महावीर जयंती हा जैन धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. भगवान महावीर यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भगवान महावीरांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला झाला होता. हा दिवस शांती, अहिंसा आणि आध्यात्मिक जागृतीची शिकवण देतो. महावीर यांची शिकवण जीवनात यश, शांती आणि संतुलनाचा मार्गही दाखवते. महावीर जयंतीनिमित्त 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया... 

भगवान महावीर यांचा जन्म | Mahavir Jayanti 2026 News

भगवान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहारमधील आताच्या वैशाली जवळील कुंडलपूर (कुंडग्राम) येथे झाला. जैन धर्मात त्यांचा जन्म अत्यंत पवित्र मानला जातो. हा दिवस महावीर यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. 

24वे तीर्थंकर

भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि अंतिम तीर्थंकर होते. तीर्थंकर म्हणजे अशा महान आत्मा, जे लोकांना मोक्ष मार्ग दाखवतात. 

अहिंसेचा महान संदेश

भगवान महावीर यांनी मुख्यतः अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी प्रत्येकाप्रति दया आणि करूणेची भावना दाखवण्याचा संदेश दिला. 

साध्या जीवनाचा मार्ग

महावीरांनी साधे जीवन, त्याग आणि आत्मसंयम राखण्याची शिकवण दिली. भौतिक सुखापासून दूर राहण्यासही सांगितले. 

वयाच्या 30व्या वर्षी गृहत्याग

राजघराण्यात जन्म घेऊनही, वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांनी राजेशाही जीवनाचा त्याग केला आणि साधना तसेच तपस्येचा मार्ग स्वीकारला.

ध्यान आणि तपस्या 

महावीर यांनी जवळपास 12 वर्षे कठीण तपस्या आणि ध्यान केले, यानंतर त्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त झाले असे म्हणतात. 

(नक्की वाचा: Hanuman Jayanti 2026:पृथ्वीवर नेमके कुठे राहतात पवनपुत्र हनुमान? जाणून घ्या बजरंगबलीच्या पवित्र पर्वताचे रहस्य)

सत्य आणि आत्मसंयमाची शिकवण

महावीर यांनी सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या गोष्टींची शिकवण दिली. 

महावीर जयंती साजरी करण्याची पद्धत

या दिवशी जैन मंदिरात विशेष पूजा केली जाते, मिरवणुका (शोभायात्रा) काढल्या जातात आणि भगवान महावीर यांच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. भाविक त्यांची प्रवचने ऐकतात, जपही करतात.

दान आणि सेवेचे महत्त्व

गरिबांना भोजन देणे आणि गरजवंतांना मदत करावी.

शांती आणि आत्मचिंतन दिन

महावीर जयंती केवळ पूजेपर्यंत मर्यादित नाही तर आत्मचिंतनाचाही काळ मानला जातो. हा दिवस आम्हाला करुणा, नम्रता आणि आंतरिक शांती आत्मसात करण्यास प्रेरित करते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com