Healthy Tips: उन्हाळा ऋतू नकोसा वाटत असला तरीही केवळ आंबा खायला मिळणार म्हणून लोक एप्रिल- मे महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. आंब्याच्या गोडव्यामुळे उष्माघातामुळे होणारी समस्याही कमी झाल्यासारखे जाणवते. आंबा फळ खाल्ल्यास आरोग्यास पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन हे पोषक घटक आहेत. या पोषणतत्त्वांमुळे त्वचेलाही फायदे मिळतात. हे आम्ही नव्हे तर तर न्युट्रिशनिस्ट दिग्विजय सिंग यांनी सांगितले आहे. आंब्यामुळे त्वचेला कशा प्रकारे फायदे मिळतात? याबाबतची माहिती सांगणारा व्हिडीओ दिग्विजय सिंग यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(नक्की वाचा: तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)
आंबा त्वचेसाठी फायदेशीर
दिग्विजय सिंग यांनी सांगितले की, एका मध्यम आकाराच्या आंब्याचे वजन 150 ग्रॅमपर्यंत असते आणि त्यामध्ये केवळ 100 ग्रॅम कॅलरीज् असतात. त्यामुळे डाएट करतानाही आपण हे फळ खाऊ शकता. आंबा खाल्ल्याने शरीराला दैनंदिन गरजेनुसार 50 ते 60 टक्के 'व्हिटॅमिन सी'चा पुरवठा होतो.
- 'व्हिटॅमिन सी' शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही.
- आंब्यातील 'व्हिटॅमिन ए' त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होतात.
- आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोटाचे आरोग्य (Stomach Health) आणि पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते.
- आंब्यामध्ये मँगिफेरिन नावाचे अँटी-ऑक्सिडंटही आढळते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते.
(Mangoes Alert: सावधान! आंब्यांवर मारताय ताव? FSSAIनं दिला इशारा)
आंबा खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
न्युट्रिशनिस्ट सिंग यांच्या माहितीनुसार, आंबा खाण्यापूर्वी तो दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. यानंतर तुमच्या आवडत्या पद्धतीने आंबा खाऊ शकता. उदाहरणार्थ सॅलेड किंवा मँगो लस्सी
(नक्की वाचा: नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण)
आंबा खाण्याचे हे देखील आहेत फायदे
त्वचेला अँटी- एजिंग गुणधर्माचा पुरवठा होण्याव्यतिरिक्त आंबा खाण्याचे कित्येक फायदे आहेत.
- आंब्याच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत मिळते.
- आंब्यामध्ये मॅग्नेशियम व पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. यामुळे हदयातील जळजळ होण्याचा धोका देखील कमी होतो.
- बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.
- आंब्याच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.
- आंब्याच्या सेवनामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत मिळते. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.