पाणीपुरी हा पदार्थ आवडत नाही, अशी व्यक्ती विरळच असेल. रस्त्याच्या बाजूच्या पाणीपुरी स्टॉलवर हमखास गर्दी असते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना पाणीपुरी आवडते. पण, याच पाणीपुरीमुळे कॅन्सर होण्याची भीती आहे. कर्नाटकमधील पाणीपुरीच्या नमुण्यांचं परिक्षण करण्यात आलं. त्यामधील रिपोर्टनं सर्वांनाच धक्का दिलाय. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जमा केलेले 22 टक्के नमुने सुरक्षा निकषांची पूर्तता करत नसल्याचं आढळंय. इतकंच नाही तर 41 नमुन्यांमध्ये कॅन्सर निर्माण करणारे कार्सिनोजेनिक (Carcinogenic) आढळले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या रिपोर्टनुसार एकूण 260 पैकी 41 नमुन्यांमध्ये कृत्रिम रंग आणि कॅन्सर निर्माण करणारे घटक आढळले आहेत. 'हिंदुस्थान टाईम्स' मधील वृत्तानुसार अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास यांनी डेक्कन हेरॉल्डला सांगितलं की, 'त्यांच्याकडं रस्त्याच्या बाजूला मिळणाऱ्या पाणीपुरीच्या गुणवत्तेबाबात अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारावर आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. खाद्य सुरक्षा विभागानं रस्त्याच्या बाजूच्या स्टॉलपासून ते चांगल्या हॉटेलपर्यंत वेगवेगळे नमुने एकत्र केले. त्यामधील अनेक नमुने (सॅम्पल) शिळे आणि खाण्यासाठी अयोग्य होते.'
केमिल्सचा समावेश
खाद्य सुरक्षा आयुक्त श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार पाणी पुरीच्या नमुन्यांमध्ये ब्रिलियंट ब्लू, सनसेट येलो और टार्ट्राज़िन हे रसायनं आढळली. या केमिकल्समुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
( नक्की वाचा : 'हे' 5 उपाय केल्यास तुमच्या जवळपासही फिरकणार नाही डेंग्यूचा डास )
फूड कलर रोडमाईन-बी चा देखील यामध्ये वापर केला जातो. रोडमाईन-बी वर कर्नाटकात बंदी आहे. तर तामिळनाडू सरकारनं याच पद्धतीनं कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कॅन्सरची निर्मिती असलेले केमिकल्स असल्याचं चाचण्यांमधून निश्चित झालं तर आरोग्य मंत्रालय याबाबत कठोर कारवाई करेल, असं राव यांनी स्पष्ट केलं आहे.