Marathi Bhasha Gaurav Din Shubhechha : महाराष्ट्र राज्याचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानाची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी आज राज्यभर 'मराठी भाषा गौरव दिन' (Maharashtra Bhasha Gaurav Din) उत्साहात साजरा होत आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासह जगभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच लाडके 'कुसुमाग्रज' यांच्या आठवणीत आज राज्यभरात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो?
मराठी साहित्यातील दिग्गज कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण 'कुसुमाग्रज' म्हणून (kusumagraj janm divas) ओळखतो त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. मराठी साहित्य आणि भाषेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. कुसुमाग्रज हे केवळ कवी नव्हते, तर ते एक थोर मानवतावादी लेखक होते. त्यांच्या 'नटसम्राट' या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला, तर 'विशाखा' या काव्यसंग्रहाने भारतीय साहित्यात मोलाची भर घातली.
यानिमित्ताने आपल्या प्रियजनांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवा आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करा. (Marathi Bhasha gaurav Din 2026 Wishes, Messages, Quotes, Status Greetings in Marathi)

१ पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा...
२ माझा मराठी चा बोल कौतुके।परि अमृताते हि पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा...
३ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा...

४ समृद्धीची पावनगंगा भरुन येथे नित्य वाहते
मनगटात यश आहे अमुच्या आणि कीर्ती ललाटी
मी मराठी, मी मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा...
५ माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यांतील शिळा
रत्नजडित अभंग, पोवाडे अन् ओव्यांची सखी
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा...
६ जात मराठी, धर्म मराठी
शान मराठी आणि अभिमान मराठी...
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

७ शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
८ ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी .. मी मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
९ मराठी भाषा, मराठी मन
अभिमान महाराष्ट्राचा,
स्वाभिमान मराठीचा...
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
१० केवळ एक दिवसासाठी नाही तर आयुष्यभरासाठी माय मराठीचं स्थान हृदयात...
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
११ गर्व नाही, माज आहे मला मराठी असल्याचा, असं म्हणताना मराठी भाषेवरील प्रेम कमी होऊ देऊ नका..
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world