मारुती सुझुकीचं ऐतिहासिक पाऊस, देशातील पहिली 'WagonR Flex Fuel' कार लाँच; शेतकऱ्यांना होणार फायदा

भारताची पहिली फ्लेक्स-इंधन पॅसेंजर कार 'वॅगनआर फ्लेक्स फ्यूल' (WagonR Flex Fuel) अधिकृतपणे लाँच केली आहे. ही कार E85 इंधनावर (85% इथेनॉल आणि 15% पेट्रोलचे मिश्रण) चालण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

WagonR Flex Fuel car launch: देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने गुरुवारी भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू केला आहे. कंपनीने भारताची पहिली फ्लेक्स-इंधन पॅसेंजर कार 'वॅगनआर फ्लेक्स फ्यूल' (WagonR Flex Fuel) अधिकृतपणे लाँच केली आहे. ही कार E85 इंधनावर (85% इथेनॉल आणि 15% पेट्रोलचे मिश्रण) चालण्यास पूर्णपणे सक्षम आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाहनाचे अनावरण करण्यात आले.

भारतासमोरील दोन मोठी आव्हाने होणार दूर

या लाँचिंगप्रसंगी बोलताना मारुती सुझुकीचे एमडी आणि सीईओ हिसाशी ताकेउची म्हणाले की, भारतासमोर सध्या दोन मोठी राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि कार्बन उत्सर्जनात घट करणे. "फ्लेक्स-इंधन हे दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी पूर्ण करते. हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' आणि स्वच्छ आहे," असे ताकेउची यांनी सांगितले. दीर्घकाळासाठी परदेशी कच्च्या तेलावर अवलंबून राहणे भारतासाठी पर्याय असू शकत नाही, त्यामुळे देशाला देशांतर्गत क्षमतेवर आधारित आणि परवडणाऱ्या ऊर्जा उपायांची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.

Advertisement

(नक्की वाचा-  Hero MotoCorp New Bike: हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! पेट्रोल किंवा चार्जिंगशिवाय धावणार बाईक)

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि 'आत्मनिर्भर भारत' संकल्पना

हिसाशी ताकेउची यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत म्हटले की, जेव्हा कोणाचाही बायोफ्युएलवर विश्वास नव्हता, तेव्हा गडकरींनी उद्योगाला दिशा दाखवली की भारतीय शेतकऱ्यांचे उत्पादन परदेशी तेलाला पर्याय ठरू शकते. हे तंत्रज्ञान थेट शेतीशी, तंत्रज्ञान शेतकऱ्यांशी आणि स्वच्छ ऊर्जा आत्मनिर्भर भारताशी जोडते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.

WagonR Flex Fuel

इकोसिस्टमची अजूनही गरज

या तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रसारासाठी केवळ कार लाँच करणे पुरेसे नाही, तर यासाठी संपूर्ण इकोसिस्टम विकसित करावी लागेल, असे ताकेउची यांनी नमूद केले. यामध्ये प्रामुख्याने इंधनाची (Ethanol) सहज उपलब्धता, बाजारपेठेत अधिक वाहनांचे पर्याय, ग्राहकांमध्ये जनजागृती, इंधन आणि वाहनांचे स्पर्धात्मक दर या गोष्टींचा समावेश आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यावरच फ्लेक्स-फ्यूल कारचा वापर वाढेल. बाजारातील आघाडीची कंपनी म्हणून मारुती सुझुकीने हे पहिले पाऊल उचलले आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: "अभिनेता रिटेक घेत वारंवार किस करत राहिला अन् सीनंतरही..." प्रिया बापटचे सांगितल 'तो' धक्कादायक अनुभव)

मारुती सुझुकीचा भविष्यातील 'ग्रीन रोडमॅप

  • कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG)-  9 सीबीजी प्लांटची घोषणा, ज्यापैकी 2 प्लांट आधीच कार्यान्वित आहेत. 
  • हायड्रोजन (Hydrogen)- हायड्रोजन इंधनावर आधारित वाहनांवर सध्या संशोधन प्रकल्प सुरू आहेत.
  • इतर तंत्रज्ञान - इलेक्ट्रिक वाहने (EVs), स्ट्रॉन्ग हायब्रिड, सीएनजी (CNG) कारचा विस्तार.
  • पर्यावरण पूरक योगदान - गेल्या आर्थिक वर्षात एकूण हरित वाहन विक्रीत मारुतीचा वाटा 50% होता. 
Topics mentioned in this article