One Minute Meditation Benefits: धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ काढणे अतिशय आव्हानात्मक ठरतंय. बहुतांश लोक दिवसाची सुरुवातही काम करुनच करतात. सकाळी उठताच लोक आधी मोबाइल हाती घेऊन सोशल मीडिया, नोटिफिकेशन तपासतात. वारंवार स्क्रीन पाहिल्याने आपला मेंदू कायम व्यस्त राहतो. अशा परिस्थितीत मानसिक ताण एक सामान्य समस्या ठरतेय, आजारांचाही धोका वाढतो. वेळीच आरोग्याची काळजी घेतल्यास निरोगी जीवन जगण्यास मदत मिळेल. स्वतःसाठी केवळ एक मिनिटही काढल्यास सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते, यासाठी तज्ज्ञ मेडिटेशन करण्याचा सल्ला जेतात. सकाळी केवळ मिनिटभर मेडिटेशन केल्यास काय होते? मेडिटेशन करण्याची योग्य पद्धतही जाणून घेऊया...
मेडिटेशनबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणंय?
प्रसिद्ध योगगुरु हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यु-ट्यूब चॅनेलवर एक मिनिट मेडिटेशन करण्याचे फायदे सांगितले आहेत. ध्यान केल्यास शरीर आणि मनाला शांतता मिळते, असे त्यांनी सांगितलंय.
मेडिटेशन कस करावे?
- सकाळी उठल्यानंतर अंथरुणातून उठून बसा आणि डोळे बंद करा.
- दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा.
- तुमचे लक्ष श्वासांवर केंद्रित करा.
- काही सेकंदांसाठी तुमच्या शरीरातील संवेदना अनुभवा.
- केवळ एक मिनिट मेडिटेशन करा आणि त्यानंतर डोळे हळूहळू उघडा.
- तुम्हाला प्रसन्न वाटेल.
रोज सकाळी 1 मिनिट मेडिटेशन करण्याचे फायदे
लक्ष केंद्रित होतेडॉक्टर हंसा यांच्या माहितीनुसार, रोज सकाळी केवळ एक मिनिट ध्यान केल्यास तुमचे मन मोकळे आणि मेंदू सतर्क होईल. दिवसभराच्या कामांमध्ये तुमच लक्ष केंद्रित राहील, कामं पटकन होतील आणि कार्यक्षमता सुधारेल.
(नक्की वाचा: Winter Health News: बीट ज्युसमध्ये लिंबू पिळल्यास काय होईल? 15 दिवस हा उपाय केल्यास शरीरात होतील मोठे बदल)
तणाव कमी होईलएक मिनिट ध्यान केल्यास शरीराला आराम मिळेल आणि मन शांत होईल. तुमचा संपूर्ण दिवसही चांगला जाईल.
(नक्की वाचा: Health News: केसगळती, डोकेदुखी, नैराश्य, मूत्रमार्गातील संसर्गाचा सामना करताय? शरीरात होतेय या गोष्टीची कमतरता)
ऊर्जा आणि सकारात्मकता- सकाळी केवळ एक मिनिट ध्यान केल्यास दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहील. महत्त्वाचे म्हणजे मूड चांगला राहील.
- नियमित एक मिनिट ध्यान केल्यास मानसिक आरोग्यामध्ये मोठे बदल दिसून येतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)