WhatsApp, फेसबुक आणि मेसेंजरवर फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही, Meta ने सुरु केले नवे फिचर्स

व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरच्या नव्या वैशिष्ट्यांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवीन अॅण्‍टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Tech News In Marathi

व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि मेसेंजरच्या नव्या वैशिष्ट्यांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नवीन अॅण्‍टी-स्कॅम फिचर्सच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे संशयास्पद कृतींना आळा बसणार आहे. यूजर्सला सावध करण्यासाठी आणि त्‍यांचे फसवणूकीपासून संरक्षण करण्‍यासाठी ही सिस्टम सुरु करण्यात आली आहे. या नवीन अॅण्‍टी-स्कॅम टूल्समध्ये व्हॉट्सअॅपवर डिवाइस लिंकिंग वॉर्निंग, फेसबुकवर संशयास्पद फ्रेंड रिक्वेस्टबद्दलचे अलर्ट आणि मेसेंजरवर प्रगत स्कॅम डिटेक्शन यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

वर्तणूकीशी संबंधित असलेल्या संकेतांवरून लिंकिंग रिक्वेस्ट संशयास्पद वाटली तर व्हॉट्सअॅप आता वापरकर्त्यांना सावध करेल. स्कॅमर्स अनेकदा व्‍यक्तींची फसवणूक करून त्यांचे व्हॉट्सअॅप खाते दुसऱ्या डिवाईसशी जोडण्यास किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी प्रवृत्त करतात. हे अलर्ट्स यूजर्सना अशा रिक्वेस्ट कुठून येत आहे याची माहिती देतील आणि तो एक स्कॅम असू शकतो, याचे स्पष्ट संकेत देतील. यामुळे लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी व्‍यक्तींना थांबून विचार करण्याची संधी मिळेल.

यूजर्सला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यांना..

तुम्ही एखाद्या संशयास्पद क्रियाकलाप दाखवणाऱ्या अकाऊंटला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता किंवा अशा अकाऊंटकडून रिक्वेस्ट येते तेव्‍हा तुम्‍हाला याबाबत सूचना दिली जाईल.यामध्ये तुमचे ओळखीचे मित्र नसलेले किंवा प्रोफाइलवर वेगळ्या देशाचे लोकेशन दिसणारे अकाऊंट्स असू शकतात. हा अलर्ट व्‍यक्तींना अशा संशयास्पद रिक्वेस्ट ब्लॉक किंवा नाकारण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. मेसेंजरवरील संभाषणामध्ये बनावट नोकरीच्या ऑफर सारख्‍या फसवणुकीच्या सामान्य पद्धती दिसून येतील.तेव्हा यूजर्सला नोटिफिकेशन मिळेल आणि त्यांना ते मेसेज एआय रिव्ह्यूसाठी पाठवण्याचा पर्याय दिला जाईल. तो मेसेज स्कॅम म्हणून चिन्हांकित झाला, तर व्‍यक्तींना ते संशयास्पद अकाऊंट ब्लॉक किंवा तक्रार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबईच्या पोलीस भरतीत 4 उमेदवारांनी अंतर्वस्त्रात लपवले इंजेक्शन, 'असा' झाला पर्दाफाश

उत्‍पादनांना अपडेट करण्‍याव्‍यतिरिक्त मेटा व्‍यक्ती आणि व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी फसवणूक करणाऱ्या क्रियाकलापांविरोधात आक्रमकपणे लढा देत आहे. गतवर्षी मेटाने 159 दशलक्षहून अधिक फसवणूक करणाऱ्या जाहिराती हटवल्या आहेत. यापैकी 9 टक्‍के जाहिराती कोणीही तक्रार करण्यापूर्वी काढून टाकण्यात आल्या होत्या. 2025 मध्ये, भारतात कंपनीने फसवणूक, स्कॅम आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतींविरुद्धच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल 12.1 दशलक्षहून अधिक जाहिरातींवर बंदी घातली. यापैकी 93 टक्‍क्यांपेक्षा जास्त जाहिराती लगेचच हटवण्यात आल्या होत्या.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात भयंकर घटना! 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने जीवन संपवलं, सुसाईड नोटमुळे उडाली खळबळ

फसवणुकीचा सामना करण्यासाठी फक्त तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी पुरेशी नाही, तर त्यासाठी विशेषत: असुरक्षित व्‍यक्तींना शिक्षण देण्‍यासह त्‍यांच्‍यामध्‍ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, मेटाने इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांच्या सहयोगाने त्यांच्या 'स्कॅम से बचो'या प्रमुख मोहिमेचे तिसरे एडिशन लाँच केले. वर्षभर चाललेल्या या मोहिमेमध्ये प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री नीना गुप्‍ता आणि आघाडीचे डिजिटल क्रिएटर्स यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचा व्‍यक्तींना ऑनलाइन फसवणुकांच्‍या पद्धती ओळखून त्‍या टाळण्‍यास मदत करण्‍याचा उद्देश होता.

Topics mentioned in this article