Instagram AI Feature Latest Update : इन्स्टाग्रामने नुकतच म्यूज इमेज नावाचं एक नवं (AI) एआय इमेज जनरेशन टूल लॉन्च केलं आहे. पण लॉन्च होताच हे फिचर प्रायव्हसी संबंधीत असलेल्या काही गोष्टींशी जोडलं गेलं. त्यामुळे हे फिचर खूप व्हायरल झालं.या टूलच्या मदतीने कोणताही यूजर दुसऱ्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाऊंटला प्रॉम्टमध्ये टॅग करून त्याची एआय इमेज बनवू शकत होता.
एका ब्लॉगच्या पोस्टनंतर मेटाने स्पष्ट केलं की,हे फिचर लॉन्च करण्यात त्यांच्याकडून मोठ चूक झाली आहे. मेटाने म्हटलं की,आम्ही फिडबॅकबाबत ऐकलंय की,हे फिचर टार्गेटवर चुकलं.त्यामुळे हे फिचर आता उपलब्ध नाहीय. दरम्यान,म्यूज इमेजचं सामान्य जनरेशन टूल अजूनही अॅक्टिव्ह आहे. या फिचरबाबत टॉम क्रूझ,जेंडया आणि मेरिल स्ट्रीप सारख्या दिग्गज कलाकारांची टॅलेंट एजन्सी CAA ने मेटा विरोधात कडक भूमिका मांडली होती.एजन्सीने मागणी केली होती की,जर कोणी त्यांच्या मर्जीने त्यांच्या इमेजचा वापर एआयसाठी देणार असेल,तर ही सुविधा मिळाली पाहिजे.
नक्की वाचा >> मित्र-मैत्रिणींचा बर्थडे कधी आहे? आता WhatsApp वरही मिळणार रिमाएंडर, कसं ते जाणून घ्या
का भडकले होते इन्स्टाग्राम यूजर्स?
या वादामागचं सर्वात मोठं कारण होतं की,हे एआय फिचर डिफॉल्ट मोडमध्ये सर्व पब्लिक इन्स्टाग्राम अकाऊंटसाठी 'ऑप्ट इन' सुरू होतं.याचा अर्थ असा होता की,तुमच्या फोटोंचा वापर कोणी एआय इमेज बनवू नये, असं तुम्हाला वाटत असेल,तर तुम्हाला स्वत:ला सेटिंग्जमध्ये जाऊन हे फिचर मॅन्युअली बंद करावं लागत होतं. जर कोणी कोणाच्या अकाऊंटचा वापर करून एआय फोटो बनवत होता,तेव्हा मेटा त्या यूजरला कोणतंही नोटिफिकेशनही पाठवत नव्हता.
नक्की वाचा >> Shirdi News: "आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसेडर", शिर्डीत नितेश राणे भडकले, म्हणाले, "हिंदू तरुणांनी.."
आता अॅपमध्ये काय बदल झाला आहे.
खूप विरोध झाल्यानंतर मेटाने आता या सिस्टमला पूर्णपणे बदललं आहे. जर तुम्ही Meta AI मध्ये जाऊन कोणाचाही इन्स्टाग्राम अकाऊंट टॅग करून त्याचा फोटो बनवण्याचा प्रयत्न केला, तर एआय चॅटबॉट असं करण्यासाठी स्पष्ट नकार देईल.याचसोबतच मेटाने पब्लिक इन्स्टाग्राम अकाऊ्ंट्सची सेटिंग्जने त्या टॉगल बटणालाही काढलं आहे.