Microwave Tips: मायक्रोवेव्हमध्ये 'या' 3 गोष्टी गरम करण्याची चूक पडेल महागात, शरीरावर होतील गंभीर परिणाम

Microwave Safety Tips: मायक्रोवेव्हमध्ये काही गोष्टी गरम करणे आरोग्यासाठी आणि उपकरणासाठी धोकादायक ठरू शकते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Microwave Safety Tips: मायक्रोवेव्हमध्ये या गोष्टी गरम करणे महागात पडू शकते"

Microwave Safety Tips: मायक्रोवेव्हमुळे किचनमधील काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असो किंवा मुलांच्या शाळेचा डबा (लंच) तयार करणे असो, प्रत्येक गोष्ट मायक्रोवेव्हमुळे अगदी काही मिनिटांमध्ये होते. पण म्हणतात ना, सुविधेसोबतच हे यंत्र वापरताना काळजी घेणेही गरजेचे आहे. अनेकदा लोक मायक्रोवेव्हमध्ये अशा काही गोष्टी गरम करतात, ज्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे काही गोष्टींमधील पोषक घटक नष्ट होतात, तर काही पदार्थांमधून केमिकल्स (रसायने) बाहेर पडू लागतात. जर तुम्ही एखादी गोष्ट मायक्रोवेव्हमध्ये गरम करत असाल, तर माहिती पूर्ण वाचणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

मायक्रोवेव्हमध्ये कोणत्या गोष्टी गरम करू नये?

अंडे

जर तुम्ही कवचासह अंडे मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी ठेवले, तर आत तयार होणाऱ्या वाफेमुळे अंडे फुटू शकते. यामुळे केवळ मायक्रोवेव्ह आतून घाण होणार नाही, तर ते खराबही होऊ शकतो. म्हणूनच अंडे गरम करण्यापूर्वी एक तर त्याचे टरफल काढून घ्या किंवा ते वेगळे फोडून मगच आत ठेवा.

Advertisement

(नक्की वाचा : Nautapa 2026: सतर्क राहा! नवतपामध्ये चुकूनही करू नका या 4 गोष्टी, नाहीतर थेट हॉस्पिटलमध्ये व्हावे लागेल भरती)

प्लास्टिक कंटेनर (प्लास्टिकचे डबे)

तुम्हाला माहीत आहे का, काही प्लास्टिकचे कंटेनर्स केमिकल्स सोडतात, जे खाद्यपदार्थांमध्ये मिसळण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच कोणत्याही प्लास्टिकच्या वस्तूमध्ये अन्न गरम करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

(नक्की वाचा : जांभूळ खाल्ल्यास ब्लड शुगरवर काय परिणाम होतो? वाचा 5 मोठे फायदे, Jamunला English मध्ये काय म्हणतात?)

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स आढळतात. जर तुम्ही पालक, मेथी यासारख्या हिरव्या भाज्या वारंवार गरम केल्या, तर त्यांचे रूपांतर हानिकारक घटकांमध्ये होऊ शकते आणि ते शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणूनच या भाज्या गरजेपेक्षा जास्त गरम करू नका.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)