Milk Packet Color Code: दुधाच्या पिशवीवर निळा, हिरवा आणि नारिंगी रंग का असतो? 99% लोकांना माहिती नसणार कलर कोड

Milk Packet Color Code: दुधाच्या पिशवीवर असणारा निळा, हिरवा आणि नारिंगी रंग नेमके काय अर्थ सुचवतात? तुम्ही देखील चुकीचे दूध खरेदी करताय का? तुमच्या कुटुंबासाठी योग्य दूध निवडण्याचे गुपित जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Milk Packet Color Meaning: दुधाच्या पाकिटावरील वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय?"
Canva

Which Milk Packet is Best: बाजारात जेव्हा तुम्ही दूध खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्हाला निळ्या, हिरव्या आणि नारिंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या पिशव्या पाहायला मिळत असतील. पहिल्या नजरेत हे केवळ पॅकेजिंगचा भाग वाटत असले, तरी प्रत्यक्षात या रंगांमध्ये एक खास माहिती दडलेली असते. या रंगांचा अर्थ म्हणजे दूध हलके, मध्यम आणि जास्त क्रिमी अशा स्वरुपाचे असते. याच कारणामुळे अनेक लोक लेबल न वाचताच केवळ रंगावरून योग्य दुधाची निवड करतात. रंगांची ही भाषा इतकी प्रचलित झाली आहे की, घराघरात लोक 'दुधाची निळ्या रंगाची पिशवी घेऊन ये' अशा शब्दांत सूचना दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया दुधाच्या पिशवीवरील या  रंगांमागील अर्थ... 

दुधाच्या पाकिटावरील रंगांचा अर्थ काय? | What Do The Colors On Milk Packets Signify?

भारतात दुधाच्या पाकिटावर दिसणारे रंग केवळ डिझाइन नसून ते एक प्रकारचे शॉर्टकट कोड असतात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) पॅकेजिंगवर घटक, लायसन्स नंबर यासारखी महत्त्वाची माहिती अनिवार्य करण्यात आलीय, पण रंगांची निवड डेअरी कंपन्या स्वतः करतात.

Advertisement

सामान्यतः या रंगांचा अर्थ असा असतो:

  1. निळा रंग: टोंड दूध (साधारण 3 टक्के फॅट)
  2. हिरवा रंग: स्टँडर्डाइज्ड दूध (साधारण 4.5 टक्के फॅट)
  3. नारिंगी रंग: फुल क्रीम दूध (साधारण 6 टक्के फॅट)
  4. मॅजेंटा रंग: डबल टोंड दूध (साधारण 1.5% फॅट)

याचा अर्थ असा की, हे रंग थेट दुधातील फॅट्सचे प्रमाण आणि दुधाचा दाटपणा दर्शवतात. जर तुम्हाला हलक्या स्वरुपातील दूध हवे असेल तर निळे आणि जर जास्त मलईदार दूध हवे असेल तर तुम्ही नारिंगी रंगाचे पिशवी विकत घेऊ शकता. 

डेअरी कंपन्या रंगांचा वापर का करतात?

दूध हे असे उत्पादन आहे जे लोक रोज खरेदी करतात, अनेकदा जास्त विचार न करता. अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी पॅकेजिंग सोपे आणि त्वरित समजणारे असणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा: Stale Dough Side Effects: सावधान! फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची पोळी खाताय? पोषणतत्त्व नाही, पोटात हे विष जातंय)

रंगांचा वापर करण्यामागे अनेक फायदे आहेत, उदाहरणार्थ...

  1. त्वरित निर्णय घेणे सोपे: ग्राहकांना आपल्याला नेमके कोणते दूध हवे आहे हे लगेच ओळखता येते.
  2. वेगळी ओळख: एकाच ब्रँडचे विविध प्रकार सहज वेगळे दिसतात.
  3. लक्षात ठेवणे सोपे: लोक ब्रँडपेक्षा रंग अधिक लक्षात ठेवतात.
  4. वेळेची बचत: लेबल वाचण्याची गरज पडत नाही.

भारतासारख्या देशात जेथे प्रत्येक वर्गातील लोक दूध खरेदी करतात, तेथे ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते.

रंगावरून दुधाची गुणवत्ता समजते का?

अनेक लोकांचा असा समज असतो की पाकिटावरील गडद किंवा चकाकणारा रंग चांगल्या दुधाचे लक्षण आहे, पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. प्रत्यक्षात रंग फक्त दुधात किती फॅट्स आहेत हे सांगतो, दुधाची गुणवत्ता कशी आहे हे नाही.

  1. डबल टोंड दूध हलके असते आणि त्यात फॅट्सचे प्रमाण कमी असते.
  2. टोंड दूध मध्यम स्वरूपाचे असते.
  3. स्टँडर्डाइज्ड दूध थोडे अधिक समृद्ध असते.
  4. फुल क्रीम दूध सर्वात जास्त मलईदार असते.

त्यामुळे तुमच्या गरजेनुसार जे दूध योग्य आहे तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. उदाहरणादाखल चहासाठी हलके किंवा मिठाईसाठी घट्ट दूध वापरले जाते.

(नक्की वाचा: Fennel Seeds Water Benefits: गॅस, ॲसिडिटी, फॅटपासून हवीय सुटका? सलग 15 दिवस प्या हे पाणी, संपूर्ण शरीरच बदलेल)

Advertisement

Photo Credit: NDTV Marathi

डिझाइनचा मोठा फायदा
 

पहिल्या नजरेत दुधाचे पाकिट किंवा पिशवीवरील रंग केवळ एक डिझाइन वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ही एक स्मार्ट आणि उपयुक्त यंत्रणा आहे. यामुळे दूध खरेदीची प्रक्रिया सुलभ होते, विविध प्रकारच्या दुधाची त्वरित ओळख करून देते आणि ग्राहकांना योग्य निवड करण्यास मदत करते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )